JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha News: पर्यावरणाचे धडे देणारी शाळा, हरितसेनेची राष्ट्रीय पातळीवर दखल, पाहा Video

Wardha News: पर्यावरणाचे धडे देणारी शाळा, हरितसेनेची राष्ट्रीय पातळीवर दखल, पाहा Video

वर्धा जिल्ह्यातील केसरीमल कन्या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षिका मनिषा साळवे यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 22 मार्च : सध्या पर्यावरण संवर्धनाचे धडे देणारे विविध उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात येत आहेत. शहरीकरणामुळे निसर्गापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात आणण्याचा प्रयत्न या उपक्रमांच्या माध्यमातून केला जातो. असेच उपक्रम वर्धा येथील केसरीमल कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येतात. हरितसेनेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थिनी पुढाकार घेत आहेत. त्यांच्या या उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात असून सर फाऊंडेशनकडूनही गौरविण्यात आले आहे. उपक्रमशील कन्या शाळा वर्धा येथील केसरीमल कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय उपक्रमशील मानले जाते. येथे विद्यार्थिनींसाठी विविध शैक्षणिक उपक्रम घेतले जातात. त्यासाठी शाळेतील प्राचार्य जयश्री कोंडगिरकर आणि शिक्षक पुढाकार घेतात. विद्यार्थिनींना पर्यावरणपुरक सण, उत्सव साजरे करण्याचे धडे दिले जातात. तसेच पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाबाबत कार्यक्रम घेतले जातात.

पर्यावरणपुरक सण, उत्सव केसरीमल कन्या शाळेमध्ये हरीत सेना आहे. हरीत सेनेतील विद्यार्थ्यांकडून वृक्षसंवर्धन व संगोपगानाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. वृक्षारोपण केले जाते. विद्यार्थिनींकडून झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला जातो. विद्यार्थिनीला आपल्या भावाची म्हणजे त्या झाडची संरक्षण व संगोपनाची जबाबदारी दिली जाते. तशाच प्रकारे दसऱ्याला झाडाची पाने वाटून झाडाला नुकसान करण्यापेक्षा फुल किंवा शुभेच्छापत्र देऊन हा सण साजरा केला जातो. फटाके मुक्त दिवाळी साजरी केली जाते. Beed News: मराठवाड्यातील छोट्या खगोलशास्त्रज्ञानाला मिळणार मोठी संधी, पाहा Video सर फाउंडेशनकडून सन्मान शाळेत पर्यावरण सप्ताह साजरा केला जातो. तसेच वृक्षदिंडी काढून वृक्षसंवर्धानचे कार्यक्रम घेतले जातात. शाळेची परसबागही आहे. या कामात हरीत सेनेचा सहभाग असतो. त्यासाठी शिक्षिका मनिषा साळवे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी त्यांना विविध पुरस्कारही मिळाले आहेत. महाराष्ट्र गौरव शिक्षक पुरस्कार लातूर 2018 मिळाला आहे. तसेच सर फाउंडेशनकडूनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या