JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रक्त देताय की आजार? 2 एड्सग्रस्तांनी रक्तदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघड

रक्त देताय की आजार? 2 एड्सग्रस्तांनी रक्तदान केल्याचा धक्कादायक प्रकार उघड

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. परंतु, वर्धा येथे दोन एड्सग्रस्तांनी रक्तदान केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 21 फेब्रुवारी: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या काळात तब्बल 2 हजार 44 व्यक्तींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. हे रक्त सर्व बाजूने पडताळणी करून गरजू व मृत्यूशी झुंज देणाऱ्यांना देण्यात येते. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने जीवनदान ठरते. परंतु, वर्धा येथे दान केलेल्या रक्तातील दोन व्यक्तींचे रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. 15 व्यक्तींच्या रक्तात आढळला दोष जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत बारा महिन्यांत 2044 व्यक्तींनी रक्तदान केले. या सर्व व्यक्तींच्या रक्ताची तपासणी केली असता दोन व्यक्तींचे रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह आले आहे. 15 व्यक्तींच्या रक्तामध्ये दोष आढळला आहे. यात हेपॅटायटिस-बी पॉझिटिव्ह आलेल्या दहा व्यक्तींचा समावेश आहे. तर दोन व्यक्तींचे रक्त्त हेपॅटायटिस-सी पॉझिटिव्ह आले आहे. असे असले तरी जिल्हा रुग्णालयात रक्तपेढीतून गरजूंना रक्त देताना तपासणी करूनच रक्त दिले जाते. त्यामुळे रक्त घेणाऱ्या रुग्णांना कोणताही धोका नसतो.

रक्तदानाचे फायदे अनेक सध्याच्या जीवनात रक्तदान करणे गरजेचे झाले आहे. एकाच्या रक्तदानामुळे इतरांना फायदा होतोच. शिवाय रक्तदान करणाऱ्यालाही अनेक लाभ मिळतात. रक्तदान केल्याने हिमोग्लोबीनची कमतरता भासेल, असे नाही. शिवाय कोणतीही हेल्दी व्यक्ती रक्तदान करू शकते. पुरुष तीन महिन्यांतून एकदा आणि महिला चार महिन्यांतून एकदा रक्तदान करू शकतात. असे असले तरी रक्तदानासंबंधित अनेक गैरसमज असल्याने रक्तदान करण्यास अनेक लोक नकार देतात. रक्तदान केल्यानंतर 21 दिवसांनी रक्त पुन्हा तयार होते. त्यामुळे रक्तदान हे फायद्याचेच ठरते. Wardha News: विद्यार्थ्यांनी सोडवला पाणी प्रश्न, एकत्र येऊन गावासाठी बांधला बंधारा! Video कोण रक्तदान करू शकत नाही? मधुमेहींना इन्सुलिन असेल तर त्यांना रक्तदान करता येणार नाही. मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्यांद्वारे त्या आजारांवर नियंत्रण असेल तर ती व्यक्ती रक्तदान करू शकते. हृदयविकार, कर्करोग, इपिलेप्सी, सोरायसिस यांसारख्या त्वचांचे आजार असलेल्या व्यक्तींना रक्त्तदान करता येणार नाही. महिला गर्भवती असल्यास व मूल अंगावर स्तनपान करीत असल्यास तसेच मासिक पाळी सुरू असल्यास रक्तदान करू नये. रक्तदान करताना काय काळजी घ्यावी? रक्त्तदान केल्यानंतर दर तीन तासांनी भरपेट खाणं गरजेचं आहे. रक्त्तदान केल्यानंतर ज्यूस, चिप्स, फळं यासारखा आहार घ्यावा. शरीराला आवश्यक पदार्थ सातत्याने खाल्ले नाही तर त्याचा परिणाम लगेच दिसू लागतो. रक्त्तदान केल्यानंतर पुढील 12 तासांमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू नये. Wardha News: बेरोजगार हातांना मिळणार ‘हवं ते काम’, 8 लाखांहून जास्त तरुणांचा फायदा! रक्त तपासूनच दिले जाते जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान करून नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपावी. गरजूंना रक्त देताना योग्य ती काळजी घेतली जाते. सर्व प्रकारच्या तपासण्या करूनच रक्त दिले जाते. त्यामुळे रक्तपेढीतून दिलेले रक्त हे धोकादायक नसते, अशी माहिती सामान्य रुग्णालय रक्तपेढी प्रमुख लीना माटे यांनी दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या