जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha News: विद्यार्थ्यांनी सोडवला पाणी प्रश्न, एकत्र येऊन गावासाठी बांधला बंधारा! Video

Wardha News: विद्यार्थ्यांनी सोडवला पाणी प्रश्न, एकत्र येऊन गावासाठी बांधला बंधारा! Video

Wardha News: विद्यार्थ्यांनी सोडवला पाणी प्रश्न, एकत्र येऊन गावासाठी बांधला बंधारा! Video

वर्धा जिल्ह्यातील मोर्चापूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बंधारा बांधला आहे. त्यामुळे गावची पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटणार आहे.

  • -MIN READ Wardha,Maharashtra
  • Last Updated :

    वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 20 फेब्रुवारी : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात पाणी समस्या जाणवते. त्यासाठी पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे असते. तसेच भूजल पातळी वाढविण्यासठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हाच चांगला उपाय मानला जातो. सरकारकडूनही भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. आता वर्धा जिल्ह्यातील मोर्चापूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बंधारा बांधला आहे. मोर्चापुरात पाण्याची समस्या वर्ध्यातील इंद्रप्रस्थ न्यु आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण शिबीर अंतर्गत मोर्चापूर या गावातील विविध समस्या जाणून घेतल्या. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, पाण्याची समस्या गंभीर आहे. त्यामुळे गावातील पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधण्याची कल्पना पुढे आली. नंतर प्राध्यापक संदीप गिरडे यांच्याशी चर्चेत बंधारा बांधण्याचा निर्णय झाला.

    News18लोकमत
    News18लोकमत

    सामूहिक श्रमातून बंधारा तयार गावातील लोकांच्या मदतीने व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून बंधारा बाधायाला सुरूवात केली. सर्व विद्यार्थ्यांच्या सामूहिक श्रमातून हे काम झाले. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठीही या सामूहिक श्रमदानाचा फायदा होणार असल्याचे विद्यार्थी सांगतात. तसे विद्यार्थ्यांनी यावेळी गावकऱ्यांना पाणी संवर्धनाचे महत्त्व सांगतिले. Wardha News: बेरोजगार हातांना मिळणार ‘हवं ते काम’, 8 लाखांहून जास्त तरुणांचा फायदा! पाण्याची पातळी वाढण्यासाठी होणार फायदा विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यामुळे उन्हाळ्यात जनावरांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच या बंधाऱ्यात पाणी आडून राहिल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होणार आहे. गावातील लोकांच्या पाण्याच्या प्रश्नही काही प्रमाणात सुटणार असल्याने या बंधाऱ्याचा गावाला फायदा होईल, असे नागरिकांचे मत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात