वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 13 फेब्रुवारी : बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्यातील तब्बल 2.92 लाख बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून 9 फेब्रुवारीपासून अभियानाला प्रारंभ झाला आहे.
0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी होणार आहे. गरजूंना चांगली आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ‘जागरूक पालक, सुदृढ बालक’ अभियान राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 9 फेब्रुवारीला या अभियानाची सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनात या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी रणनीतीही तयार करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्याकडून आढावा बैठक घेऊन माहिती जाणून घेत काही मार्गदर्शक प्रभावी सूचनाही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. Wardha : ग्रामीण भागातील प्रयोगशील शाळा, शालाबाह्य विद्यार्थ्यांनाही लागली गोडी, Video आजारी बालकांना मिळेल उपचार अन् संदर्भ सेवा या अभियानांतर्गत जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, आश्रमशाळा, अंगणवाड्या, बालसुधारगृहे, अनाथालये, विविध वसतिगृहे, खासगी नर्सरी, खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय तसेच शाळाबाह्य 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान आजारी आढळून आलेल्या बालकांवर त्वरित उपचार व संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे. आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्याल?, Video 3 हजार 164 विद्यामंदिर जिल्ह्यात 3164 शाळा अंगणवाड्यांत 2 लाख 91 हजार 291 बालके आहेत. तसेच शाळाबाह्य 1396 बालके आहेत. या अभियानांतर्गत 0 ते 18 वयोगटातील एकूण 2 लाख 92 हजार 487 बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा. ज. पराडकर यांनी सांगितले.