जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्याल?, Video

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्याल?, Video

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उन्हापासून बचावासाठी काय काळजी घ्याल?, Video

उन्हाळा सुरू झाला की आरोग्याच्या तक्रारी वाढतात. पण योग्य काळजी घेतल्यास आपण तंदुरुस्त राहू शकतो.

  • -MIN READ Osmanabad,Maharashtra
  • Last Updated :

    परमेश्वर सोनावणे, प्रतिनिधी उस्मानाबाद, 11 फेब्रुवारी: उन्हाळ्यामध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी स्वतःची काळजी कशी घ्यावी हे बऱ्याच जणांना माहिती नसते. यामुळे चक्कर येणे, उष्माघात तसेच विविध आजार उद्भवू शकतात. नेमकी कोणती काळजी उन्हाळा या ऋतूमध्ये घ्यायची ते आपण पाहुयात. काळजी कशी घ्यावी उन्हाळ्यात होणारे आजार व उष्माघातचा त्रास आपण टाळू शकतो. मात्र त्यासाठी थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा वातावरणातील तापमान खूप वाढू लागते, त्यावेळी शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे. विशेषतः दुपारी ११ ते ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असल्याने बाहेर पडू नये. कुठेही बाहेर जाताना कायम सोबत गोड पदार्थ किंवा चॉकलेट ठेवावे. जेणेकरून ग्लानी आली असता इलेक्ट्रोल पाणी प्यायल्याने त्वरीत आराम मिळतो. तसेच डोळ्यांवर गॉगल्स आणि डोक्यावर टोपी वापरावी.

    News18लोकमत
    News18लोकमत

    आहार गहू, जुने तांदूळ, मूग या धान्यांचा आहारात समावेश करावा. नवीन धान्य कफ वाढवतात तसेच पचनशक्ती कमी करतात म्हणून त्यांचा रोजच्या आहारात समावेश करू नये. नाईलाजाने नवीन धान्य खावे लागल्यास ते धान्य आधी भाजून घ्यावे. जेणेकरून ते पचनास हलकी होतात.

    Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उन्हाच्या झळा असह्य, रत्नागिरीत देशातील सर्वाधीक तापमानाची नोंद

    पेय

    1.डाळिंबाचे सरबत हे पित्तशामक असते. लिंबू सरबत आणि उसाच्या रसाचे सेवन करावे. 2.नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. 3.कोकम सरबताचे सेवन करावे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही कोकम सरबत उन्हाळ्याच्या दिवसात नक्कीच पिऊ शकता. 4.फ्रिजमधील पाणी न पिता घरात माठ असेल तर त्यातील पाणी सेवन करावे. तसंच उन्हातून आल्या आल्या अजिबात पाणी पिऊ नये. 5.पाण्याबरोबर गुळाचे सेवन करणे योग्य ठरते. म्हणजे उष्माघाताचा त्रास होत नाही.

    Grapes Rate : उन्हाळ्यापूर्वी बाजारात द्राक्षं दाखल, पाहा काय आहेत यंदा भाव, Video

    व्यायाम

    उन्हाळ्यात सुरूवातीला हलका व्यायाम करावा. उष्णता वाढत राहिल्यास व्यायाम करणे कमी करावे. उन्हाळ्यात बाहेर फिरणे टाळावे, दिवसा झोपू नये, चंदनाचा लेप कपाळावर लावावा, नदी किंवा विहिरीमध्ये पोहावे, हलके आणि पातळ वस्त्रे परिधान करावेत. शीतल कारंज्याच्या संपर्कात रहावे. तसंच योगाही तुम्हाला फायदेशीर ठरतो. या सर्व गोष्टींचा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात योग्यरित्या उपयोग केल्यास तुम्हाला त्रास होणार नाही. तसंच या सर्व गोष्टी या आयुर्वेदिक असल्याने तुमच्या शरीरावर कोणतेही अन्य परिणाम होत नाहीत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात