JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING: काँग्रेसला धक्का दिल्यानंतर आता उर्मिला मातोंडकर उचलणार मोठं पाऊल!

BREAKING: काँग्रेसला धक्का दिल्यानंतर आता उर्मिला मातोंडकर उचलणार मोठं पाऊल!

उर्मिला मातोंडकर यांचे मराठी कलाकार म्हणून मातोश्रीशी चांगले संबध आहेत. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. मात्र,

जाहिरात

उर्मिला मातोंडकर- मुंबईच्या उत्तर मुंबईकडून काँग्रेस पक्षाकडून तिने निवडणूक लढवली. निवडणुक लढवण्याचं उर्मिलाची ही पहिलीच वेळ आहे. तिच्यासमोर भाजपचे तगडे उमेदवार गोपाळ शेट्टी आहेत. आतापर्यंत गोपाळ शेट्टी यांनी एकही निवडणूक लढवली नाही अशी त्यांची ख्याती आहे. हाच कित्ता शेट्टी पुन्हा गिरवतील असं चित्र दिसतंय. त्यामुळे यंदा उर्मिलाला पराभवाचा सामना करावा लागणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 सप्टेंबर : उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता त्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांना उर्मिला मातोंडकर यांनी फोन केल्यामुळे वेगळ्याच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात नार्वेकर यांना विचारलं असता फोनवरील चर्चा ही मैत्रीतून होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात अधिक तपास केला असता उर्मिला मातोंडकर यांचे मराठी कलाकार म्हणून मातोश्रीशी चांगले संबध आहेत. काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. मात्र, ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या मैत्रीपूर्ण संबधामुळे शिवसेनेवर त्यांनी कधीही टीका केली नव्हती. मातोश्रीनेही उर्मिला मातोंडकर यांच्याशी मराठी लेक म्हणूनच मैत्रीचे संबध कायम ठेवले होते. त्यामुळे आता हेच संबंध राजकीय होणार की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र, ही चर्चा राजकिय नसून ठाकरे कुटुंबाशी असलेल्या चांगल्या संबधामुळे चर्चा झाली असल्याचा खुलासा शिवसेना सचिन मिलींद नार्वेकर यांनी केला आहे. या भेटीला कुणीही राजकिय रंग देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. पण काँग्रेसला रामराम केल्यानंतर आता उर्मिला मातोंडकर भगवा खांद्यावर घेणार का…? याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे. इतर बातम्या - #WeatherToday : राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, आठवडाभरात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला; पक्ष सोडत आहे कारण… लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीमाना दिल्याचं उर्मिला यांनी म्हटलं आहे. पक्षातील अंतर्गत राजकारणावर मी 16 मे रोजी पत्र लिहलं होतं. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. मी ज्यांच्याविषयी तक्रारी केल्या होत्या. त्यांनाच पद देण्यात आल्याची तक्रार देखील उर्मिला यांनी केली होती. ‘राजकारणात माझा कोणी वापर करू नये असं मला वाटतं. म्हणून मी पक्षातून बाहेर पडत असल्याच’ त्यांनी म्हटलं होतं. तसंच यापुढेही मुंबईसाठी आणि लोकांसाठी मी काम करत राहणार असल्याचं उर्मिला यांनी सांगितलं. इतर बातम्या - नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का, ‘या’ मतदारसंघातून शिवसेना लढणार विधानसभा! मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी दिल्लीत तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना उत्तर मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देखली दिली होती. प्रचारात उर्मिला यांनी मोदी सरकारविरुद्ध जोरदार प्रचार केला. मात्र, 23 मे रोजी जाहीर झालेल्या निकालात भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतरदेखील उर्मिला मातोंडकर यांनी राजकीय प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण अखेर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचं सांगितलं. इतर बातम्या - #NewsToday: आज दिवसभारात घडणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या VIDEO: विधानसभेसाठी आघाडीचा फॉर्म्युला ठरला; ‘एवढ्या’ जागांवर राष्ट्रवादी दाखवणार करिश्मा!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या