JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी, 'या' पदासाठी करा अर्ज

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी, 'या' पदासाठी करा अर्ज

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाल्या आहेत. या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

डोंबिवली, 26 जुलै :  कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात असणाऱ्या कल्याण येथील रुक्मिणी बाई रुग्णालय आणि डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर्सची संख्या कमी असल्याने रुग्णांची सेवा करणे अवघड जात होते. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने पॉली क्लिनिक सुरू करण्याचे ठरवले असून त्या अंतर्गत पुन्हा एकदा तज्ञ डॉक्टर्स नेमण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यामध्ये 56 जागा भरण्यात येणार आहेत. 4 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरू शकता त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. महापालिकेची पॉली क्लिनिक ही नवीन संकल्पना कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे पॉली क्लिनिक ही नवी संकल्पना सुरू करण्यात येत आहे. नागरी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ही सेवा देण्यात येणार आहे. यामध्ये नागरी आरोग्य केंद्रात तपासणी झाल्यानंतर गरज पडली तर पॉली क्लिनिक मधल्या तज्ञ  डॉक्टरांचा सल्ला रुग्णांना देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा पान पाटील यांनी सांगितले.

कुठे असणार ही आरोग्य केंद्र दत्त नगर, खडेगोळवली, गौरीपाडा, ठाकुर्ली, आंबिवली, तीसगाव, मढवी, महाराष्ट्रनगर येथे हे पॉली क्लिनिक सुरू करण्यात येणार आहेत. कोणत्या डॉक्टर्सची गरज जनरल प्रॅक्टिस असणाऱ्या डॉक्टरांची पालिकेच्या रुग्णालयात गरज आहे. याव्यतिरिक्त स्त्री रोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ , त्वचा रोग तज्ञ, कान - नाक - घसा रोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ या डॉक्टरांची गरज आहे. महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध असलेला अर्ज भरा मुलाखतीस थेट उमेदवाराने उपस्थित राहणे आवश्यक असून वॉक इन इंटरव्ह्यू असल्याची माहिती पालिकेच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पान पाटील यांनी दिली आहे. अर्ज देखील स्वतः महापालिकेत येऊन देणे गरजेचे आहे. ज्यावेळी मुलाखतीला जाल आवश्यक ती कागदपत्र घेऊन जाणे गरजेचे आहे.

Top NIT College : ‘या’ एनआयटी कॉलेजचं प्लेसमेंट रेकॉर्ड सगळ्यात बेस्ट; 1.35 कोटींचं हाएस्ट पॅकेज!

काय हवी कागदपत्र दहावी परीक्षेची गुणपत्रिका, सनद , एमएससीआयटी प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेनुसार विविध सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र , महाराष्ट्र स्टेट मेडिकल कौन्सिल नोंदणी किंवा नूतनीकरण प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज दोन फोटो, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड , जन्मतारखेचा दाखला, या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति आणि झेरॉक्स लागणार असून मूळ प्रती आणल्या नाहीत तर मुलाखतीस पात्र ठरवले जाणार नाही. असे आहे पगार  तुम्ही जर दुसरीकडे डॉक्टर म्हणून काम करत असाल तर तुम्हाला ही नोकरीची संधी सहज उपलब्ध आहे. ज्या दिवशी प्रमाणपत्र तज्ञ डॉक्टर पॉली क्लिनिक येथील नागरी आरोग्य केंद्रात येतील त्यावेळी त्यांना 2000 रुपये आणि प्रत्येक रुग्णामागे 100 रुपये देण्यात येतील. त्या संपूर्ण दिवसात केवळ 5000 रुपयांपर्यंतचेच मानधन देण्यात येईल त्याहून अधिक मानधन देण्यात येणार नाही.

नोकरी आता बस्स, इंजिनिअर तरुणाने डोकं लावलं, आता महिन्याला कमावतो 4 लाख रुपये!

संबंधित बातम्या

या संकेतस्थळावरून भरता येणार अर्ज अधिक माहितीसाठी www.kdmc. gov.in या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे. तसेच तच संकेत स्थळावर अर्ज देखील करता येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या