JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dombivli News : कुत्र्यांसोबत खेळायला आवडतंय? डोंबिवलीतील ‘या’ कॅफेत घ्या मनमुराद आनंद, Video

Dombivli News : कुत्र्यांसोबत खेळायला आवडतंय? डोंबिवलीतील ‘या’ कॅफेत घ्या मनमुराद आनंद, Video

ज्या मंडळींना कुत्र्याशी खेळण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी डोंबिवलीत एक खास सोय करण्यात आलीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

डोंबिवली , 3 जुलै : पाळीव प्राणी पाळण्याची अनेकांना इच्छा आणि आवड असते. पण, घरातल्या व्यक्तींचा विरोध, सोसायटीचे नियम यामुळे ते प्राणी पाळू शकत नाहीत. यापैकी ज्या मंडळींना कुत्र्याशी खेळण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी डोंबिवलीत एक खास सोय करण्यात आलीय. डोंबिवलीच्या मीनल गोडबोले यांनी फूटप्रिंट म्हणून एक पेट होम आणि हॉस्टेल सुरू केलंय. काय आहे ही संकल्पना पाहूया कशी झाली सुरूवात? मीनल गोडबोले यांचा स्वतःचा लॅब्राडोर जातीचा सॅम नावाचा एक पाळीव कुत्रा होता.  त्या बाहेर गेलेल्या असताना डोंबिवलीत एका ठिकाणी त्यांचा कुत्रा त्यांनी दोन दिवसासाठी ठेवला. काही कारणामुळे त्याचे निधन झाले. त्यानंतर कोणत्याही प्राण्याला त्रास होऊ नये यासाठी आपण हे पॅट कॅफे आणि हॉस्टेल सुरू केले, असं गोडबोले यांनी सांगितलं.

डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुरू मंदिर रस्त्यावर हे पेट हॉस्टेल आहे. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्यावर अनेकांना त्रास होतो त्यामुळे ही जागा निवडली.  शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला इंडस्ट्रियल प्लॉट असल्याने येथे आवाजाचे कोणतेही बंधन नाही असं त्यांनी सांगितलं. कसा आहे पेट कॅफे? पेट कॅफेमध्ये गोडबोले यांच्याकडे स्वतःचे असलेले तीन हस्की आणि एक जर्मन शेफर्ड यांच्याबरोबर खेळता येते. त्यांना भरवताही येते. त्यासाठी खाऊ देखील दिला जातो.  ज्यांच्याकडे पाळीव प्राणी नाहीत मात्र त्यांना प्रचंड आवड आहे अशांसाठी हे पेट कॅफे आहे. एक तास आपण या प्रण्यांबरोबर खेळू शकतो यासाठी काही पैसे आकारले जात असले तरी ते पैसे कुत्र्यांच्या देखभालीसाठी हे पैसे वापरत असल्याचे गोडबोले सांगतात. लॅब्रेडोर की जर्मन शेफर्ड कोणता श्वान पाळणं महाग? पाहा या 5 श्वानांसाठी किती येतो खर्च? आपल्याप्रमाणेच प्राण्यांना देखील खूप मजा करावी वाटते. पालक आणि प्राण्यांचं नात घट्ट व्हावं यासाठी पेट पुलाची सुरूवात केली आहे. यामध्ये अनेक जण त्यांचे पेट घेऊन स्विमिंगसाठी येतात. आपण मुलांना घेऊन बागेत फिरायला जातो. प्राण्यांना घेऊन जाण्याची तशी कोणतीही सोय डोंबिवलीत नाही. त्यासाठी मी काही भागात पेट प्ले एरिया तयार केलाय. त्यामध्ये सर्वच प्राणी एकमेकांशी खूप खेळतात, असं गोडबोले यांनी सांगितलं. आम्ही सहा महिन्यांपूर्वी पेट हॉस्टेल सुरू केलंय. या हॉस्टेलमध्ये तुम्ही काही दिवसांसाठी प्राणी ठेवू शकता. त्यांची इथं काळजी घेतली जाते. या प्राण्यांच्या पालकांना दिवसभरातून एकदा व्हिडीओ कॉल करून अपडेट दिली जातात, अशी माहितीही गोडबोले यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या