प्रणाली कापसे/ मुंबई, 12 जुलै : ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांच्या बंगल्यात साप निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा साप संजय राऊत यांच्या बंगल्याच्या समोरच्या भागात एका ताडपत्रीच्या खाली लपून बसला होता. वेळीच सर्पमित्राला बोलावून सापाला पकडण्यात आलं आहे. वेळीच साप पकडला गेला आहे. पावसाळ्यात साप सापडल्याच्या आणि चावल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. दरम्यान कोणालाही हानी झालेली नाही.
व्हि़डीओमध्ये दिसत आहे की, सर्पमित्राने जेव्हा सापाला पकडलं तेव्हा स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी साप प्रयत्न करीत होता. जोरजोरात झटकेही देत होता. बातमी अपडेट होत आहे…