JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai News : मुंबईत भीषण अपघात; भरधाव ट्रकनं चार वाहनांना चिरडलं

Mumbai News : मुंबईत भीषण अपघात; भरधाव ट्रकनं चार वाहनांना चिरडलं

चुनाभट्टी परिसरात आज सकाळी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकनं चार वाहनांना चिरडलं आहे.

जाहिरात

ट्रकचा भीषण अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जुलै, विजय वंजारा : मुंबईतील चुनाभट्टी परिसरात आज सकाळी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एका भरधाव आरसीसी मिक्सर ट्रकनं चार वाहनांना धडक दिली. हा अपघात मुंबई ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ घडला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील चुनाभट्टी परिसरात आज सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव आरसीसी मिक्सर ट्रकनं चार वाहनांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये वाहनांचा चुराडा झाला आहे. या मिक्सर ट्रकनं दोन दोन  ऍक्टिव्हा, एक मोटार सायकल आणि एक पीयुसी व्हॅनला धडक दिली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच असलेल्या सायन रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

Mumbai News : रिक्षाचालकाच्या लेकीने सातासमुद्रापार केली सुवर्णपदकाची कमाई, असं गाठलं मुंबई ते बर्लिन!

संबंधित बातम्या

ट्रक चालक फरार    दरम्यान अपघात घडल्यानंतर हा ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या