'आज संकट माणसावर नाही तर धर्मावर आलेले असून धर्मावर आलेल्या संकटासाठी पक्ष, नेते यांना बाजूला ठेवून...
नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 27 फेब्रुवारी : ‘धर्मावर संकट येईल तेव्हा पक्ष नेते बाजूला राहू द्या मनगटाला मनगट लावून एकत्र लढा’ असं म्हणत लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत नेत्यांना आवाहन केलं आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात अभुतपूर्व असा गोंधळ पाहण्यास मिळत आहे. एकाच पक्षात दोन गट निर्माण झाल्यामुळे राज्यातील राजकारण पार ढवळून निघाले आहे. या राजकीय परिस्थितीवर इंदुरीकर महाराज यांनी प्रखर भाष्य केलं.
‘आज संकट माणसावर नाही तर धर्मावर आलेले असून धर्मावर आलेल्या संकटासाठी पक्ष, नेते यांना बाजूला ठेवून एकत्रित येण्याचे आवाहन इंदुरीकर महाराज यांनी जळगाव येथे कीर्तनातून केले आहे. (चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, “नितीन गडकरींची भाजपमध्ये घुसमट…”) ‘नेते व पक्षापूर्ती धर्म मर्यादित ठेवला तर धर्माचे काम बिघडेल त्यामुळे धर्म वाचवणे ही काळाची गरज असून पक्ष नेते यांच्यामुळे निर्माण झालेले वैर सोडून धर्मासाठी एकत्र लढा, असं म्हणत इंदुरीकर महाराज यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. अधिवेशनात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट सामना दरम्यान, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. नेहमीप्रमाणे हे अधिवेशनही वादळी ठरणार आहे. शिवसेना पक्ष नाव आणि निवडणुक चिन्हं धनुष्यबाण हे केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यामुळे, आता विधिमंडळात ठाकरे गटाचे आमदारांची काय रणनिती असणार? याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे. ( आदित्य ठाकरेंची आजपासून अग्निपरिक्षा, अधिवेशनात माणणार का शिवसेनेचा ‘तो’ आदेश? ) रविवारीच शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी सर्व ५६ आमदारांना व्हिप बजावल्यामुळे ठाकरे गटाचे आमदार हा व्हिप माणणार का? कायदेशीर निर्माण होणाऱ्या या पेच प्रसंगावर ठाकरे गटाचे आमदार कशी मात करणार? याकडेही सर्वाचे लक्ष लागलंय.