अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर , 10 फेब्रुवारी : आत रटाळ आणि वेळखाऊ प्रवास बंद होणार असून एकाच दिवसात सोलापूरकर मुंबईला जाऊन परतू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. या एक्स्प्रेसमुळे सोलापूरकरांसाठी पुणे आणि मुंबई ही शहरं काही तासांवर आली आहेत. या रेल्वेमुळे सोलापूरकरांना केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट मिळालंय. सोलापूरमध्ये सध्या चर्चेचा विषय असलेल्या या वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल सर्व माहिती पाहूया मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ चं वेळापत्रक - रेल्वेचा क्रमांक - 22225 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 11.2.2023 पासून दररोज (बुधवार वगळता) संध्याकाळी 04.05 वाजता सुटेल - दादरला 4:15 ला पोहोचेल 4.17 ला सुटेल - कल्याणला 4.53 ला पोहोचेल 4.55 ला सुटेल - पुण्यात संध्याकाळी 7:10 ला पोहोचेल 7:15 ला सुटेल - कुर्डुवाडीला 9.36 ला पोहचेल आणि 9.38 ला निघेल - सोलापूरला रात्री 10.40 ला पोहचेल Vande Bharat Express Train : इतर रेल्वेच्या तुलनेत ‘वंदे भारत’ चा वेग जास्त का असतो? सोलापूर - मुंबई ‘वंदे भारत’ चं वेळापत्रक - गाडीचा क्रमांक - 22226 -सोलापूर- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस 11 फेब्रुवारी 2023 पासून दररोज (गुरुवार वगळता) सोलापूरहून सकाळी 6.05 मिनिटांनी सुटेल - कुर्डुवाडीला 6.53 ला पोहोचेल 6.55 ला निघेल -पुण्यात 9.20 ला पोहोचेल आणि 9.25 ला सुटेल - कल्याणला 11.33 ला पोहोचेल 11.35 ला सुटेल - दादरला दुपारी 12.12 ला पोहोचेल आणि 12.14 ला सुटेल - 12.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ चे स्टॉप दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी कशी आहे गाडीची रचना ? -2 एसी एक्झिक्युटिव्ह क्लास - 14 एसी चेअर कार किती आहे तिकीट? <span class="" s1""="">सोलापूर<span class="" s2""="">-<span class="" s1""="">मुंबई चेयर कारसाठी 1,150 रुपये तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारचं 2,150 रुपये तिकीट आहे. कसं कराल बुकिंग ? ट्रेन क्रमांक 22225/22226 चे बुकिंग 10.2.2023 रोजी सर्व PRS काउंटरवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे . वंदे भारत गाड्यांच्या वेळापत्रकाबाबत तसंच अन्य माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ही वेबसाईट चेक करा किंवा NTES अॅप डाउनलोड करा.