अनुराग सुतकर, प्रतिनिधी
सोलापूर, 09 फेब्रुवारी : ‘मेक इन इंडिया’तून तयार झालेल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'मधून सोलापूरकरांना लवकरच प्रवास करता येणार आहे. सोलापूर ते मुंबई अशी एक्स्प्रेस सेवा 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी 10 फेब्रुवारीला या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. देशातील भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस, गतिमान एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या तिन्ही वेगवान असणाऱ्या रेल्वे एक्स्प्रेसला मागे टाकून वंदे भारत एक्स्प्रेस ही अतिशय वेगवान अशी रेल्वे एक्स्प्रेस बनली आहे. याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे वंदे भारत या एक्स्प्रेसचे असणारे एक्सटेरियर डिझाईन आहे.
कोणत्या प्रकारात मोडते डिझाईन?
वंदे भारत एक्स्प्रेसचे डिझाईन हे एरोडाइनामिक या डिझाईन प्रकारात मोडते. हे डिझाईन हवेच्या कोणत्याही अडथळ्याला कापीत मेन बॉडीच्या दोन्ही बाजूस समान हवा राहण्यासाठी बनलेले आहे. जरी रेल्वे प्रशासनाने एल एस बी कोचेस आणले असले तरी वंदे भारत एक्स्प्रेस ही मेमो लोकल ट्रेन आधारित इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट या तंत्रज्ञानावर बांधली गेली आहे. त्यामध्ये डिझायनर्सने विशेष मेहनत ही वजन कमी करण्यामध्ये घेतली आहे.
Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर मार्गावरील 'वंदे भारत'ला मोठा अडथळा, पाहा काय आहे कारण
शिवाय या इलेक्ट्रिक तंत्रज्ञानासाठी पावर सप्लाय म्हणजेच पेंटाग्राफ हे संख्येने चार इतके आहेत. म्हणजेच चार पेंटाग्राफ मार्फत निर्माण होणारी इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन वर या ट्रेनची पावर वाढलेली आहे. मेजर कर्व्ह तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर ट्रेन आपोआप वळणावळणाच्या रुळावर झुकेल, जेणेकरून ट्रेनमध्ये बसलेल्या रेल्वे प्रवाशांना ते जाणवणारही नाही. अशा प्रकारे, झुकलेल्या तंत्रज्ञानासह गाड्यांचा सरासरी वेग वाढेल.
अशी असेल आसन व्यवस्था
वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 2 श्रेणीच्या आसन व्यवस्थेचा समावेश असून, यात चेअरकार आणि दुसरा एक्झिक्युटिव्ह चेअर कार आहे. इतर एक्स्प्रेस गाड्यांशी तुलना केल्यास, चेअरकारची सीट थर्ड एसी सारखी असेल, तर 2 एसी आणि फर्स्ट एसी सारखी आरामदायी एक्झिक्युटिव्ह चेअर कार असेल. अनेक नवीन सुविधांमुळे त्यात प्रवास करण्याचा आनंद वेगळाच असेल.
असे असतील वंदे भारतचे तिकीट दर
सोलापूर-मुंबई चेयर कारसाठी 985 रुपये दर तिकीट दर असतील तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये 1993 रुपये तिकीट दर असतील. शिर्डी-मुंबई चेयर कारसाठी 818 रुपये दर तिकीट दर असतील तर एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये 1648 रुपये दर तिकीट दर असतील.
मुंबई-पुणे मार्गावरील महागडं तिकीट, वंदे भारत एक्सप्रेसचे दर माहितीये का?
इतरांपेक्षा वेगळेपण काय आहे ?
- सोलापूर पासून पुढे दौंड जंक्शन पर्यंत रेल्वे ट्रॅक डबलिनची कामे झाली आहेत .
- वंदे भारत एक्स्प्रेस किंवा ट्रेन ही भारतातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन आहे. बुलेट किंवा मेट्रो ट्रेनसारखे इंटिग्रेटेड इंजिन आहेत.
- पूर्णपणे स्वयंचलित दरवाजे आणि एसी कोच ट्रेनमध्ये 16 पूर्णपणे वातानुकूलित चेअर कार कोच आहेत ज्यात दोन आसन पर्याय आहेत. इकॉनॉमी आणि एक्झिक्युटिव्ह क्लास. आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्व्हिंग चेअर देण्यात आली आहे .जी 180 अंशांपर्यंत चालू शकते.
- ट्रेनमध्ये जेवणाची सुविधा सेमी-हाय स्पीड ट्रेनमधील खाद्यपदार्थ फक्त तिकिटाच्या किंमतीत समाविष्ट केले जातात. परंतु यात जेवणाची व्यवस्था असु शकते .
- ट्रेनमध्ये GPS आधारित प्रगत प्रवासी माहिती प्रणाली देखील आहे. जी तुम्हाला आगामी स्थानके आणि माहितीबद्दल अपडेट करेल.
-ट्रेनमधील स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्यासाठी बायो-व्हॅक्युम टॉयलेट बनवण्यात आले आहेत. हे भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारच्या वॉशरूमसाठी वापरले जाऊ शकते. विमानात वापरल्या जाणार्या विमानांप्रमाणेच आहेत .
-प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ट्रेनच्या सर्व 16 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ट्रेन पूर्ण थांबल्यावरच ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे उघडतील.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या काही डब्यांमध्ये व्हीलचेअर ठेवण्यासाठी जागा असेल, असं विभागीय व्यवस्थापक सोलापूर निरजकुमार डोहारे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.