अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 9 मार्च : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय. या खडतर परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य, जिद्द आणि कमिटमेंट या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ग्रामीण आयुष्यात असणारा संघर्ष आणि वास्तवाची जाण असल्यानं या विद्यार्थ्यांना या सवयी सहज अंगवळणी पडतात. त्याचाच फायदा त्यांना स्पर्धा परीक्षेत होतो. सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्याच्या सुरेखा सौदागर कांबळे यांनी या परीक्षेत मोठं यश मिळवलं. सुरेखा या परीक्षेत एससी वर्गातून राज्यात दुसऱ्या आल्या आहेत. कसा झाला प्रवास? मोहोळ तालुक्यातील देवडी हे सुरेखा यांचं गाव. याच गावातील जिल्हा परिषद शाळेत त्यांचं शालेय शिक्षण झालं. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरुवातील मोहोळच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये तर नंतर पुण्यातील कृषी महाविद्यालयातून तिनं पदवी पूर्ण केली. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय अधिकारी होण्याचं ध्येय सुरेखा यांनी बाळगलं होतं. त्यांनी कोणताही क्लास न लावता या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं.
राज्य लोकसेवा आयोगाच्या 2020 साली झालेल्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या. नायब तहसीलदार म्हणून त्यांची निवड झाली. सध्या त्या नागपूरमधील वनामती इथं याबाबतचं प्रशिक्षण घेत आहेत. या सर्व प्रवासात त्यांनी राज्यसेवेची परीक्षा दुसऱ्यांदा दिली आणि थेट क्लास वन अधिकारी म्हणून या परीक्षेत यश मिळवलंय. मराठीत दिली परीक्षा, सोलापुरात येताच रचला इतिहास! कशा आहेत पालिकेच्या आयुक्त? पाहा Video माझ्या यशाची प्रेरणा… सुरेखा यांचे आई-वडिल दोघंही शेती करतात. आपल्या यशाची तेच प्रेरणा असल्याचं सुरेखा यांनी यावेळी सांगितलं. आई-वडील आणि भावाने मला नेहमीच साथ दिली आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे यश मिळवलंय. प्रशासकीय सेवेत काम करतानाही आई-वडिलांचा आदर्श ठेवून लोकांसाठी काम करण्याचा माझा प्रयत्न असेल. पूनमनं करून दाखवलं, छोट्या गावातून आली अन् उपजिल्हाधिकारी झाली! Video माझ्यामुळे माझ्या आई-वडिलांचं, गावाचं नाव मोठं व्हावं असं मला नेहमी वाटत असे. या परीक्षेतील यश हे त्या दिशेचं पहिलं छोटसं पाऊल आहे, याचा मला आनंद आहे. इथून पुढंही मी गावाचं नाव उंचावण्याचा प्रयत्न करेन. सामान्य नागरिक म्हणून मी आजवर सरकारी ऑफिस बाहेरुन पाहिलं आहे. अधिकारी म्हणून काम करताना अधिकाधिक लोकांच्या संपर्कात राहण्याचा आणि सर्व यंत्रणा पारदर्शक करण्याचा माझा प्रयत्न असेल,’ असा निर्धार सुरेखा यांनी यावेळी बोलून दाखवला.