JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Success Story : सोलापूरच्या मोनालीला मिळाली आईपासून प्रेरणा, पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश, Video

Success Story : सोलापूरच्या मोनालीला मिळाली आईपासून प्रेरणा, पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश, Video

Success Story : सोलापूरच्या मोनालीला कॉलेजचं शिक्षण सुरू होताच मोठा धक्का बसला होता. त्यानंतर तिनं आईपासून प्रेरणा घेत यश मिळवलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 25 मार्च : एखादं मोठं लक्ष्य साध्य करण्यासाठी मार्गात अनेक अडथळे येतात. परीक्षेचे प्रसंग येतात. त्या सर्वांवर मात करुन ध्येयावरील फोकस न हटवता प्रयत्न करणारी व्यक्तीच ही ते लक्ष्य साध्य करु शकते. सोलापूरच्या मोनाली साधू गावडे यांनी ते दाखवून दिलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेत त्यांची कनिष्ठ न्यायाधीशपदी निवड झालीय. लातूर पॅटर्नचा प्रभाव मोनाली यांनी शालेय शिक्षण हे सोलापूरच्या शांतीनिकेतन हायस्कुलमध्ये घेतलं. त्यानंतर लातूरच्या कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या लातूर पॅटर्नमुळे त्यांच्या अभ्यासाला एक दिशा मिळाली. त्यांनी लातूरच्याच दयानंद विधी महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पुण्यातून यामधील पदव्यूत्तर शिक्षण घेतले. शिपायाच्या मुलीनं घडवला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश! Video आईपासून मिळाली प्रेरणा मोनाली यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं होतं त्याचवेळी 2010 साली त्यांच्या आई रुक्मिणी गावडे यांचं अकस्मिक निधन झालं. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. या धक्क्यातून त्यांनी स्वत:ला सावरलं. आपल्या यशाची प्रेरणा आईच असल्याचं त्या सांगतात. भाऊ आणि वडिलांसह बीमलेश कुमार कटियार या शिक्षकांनीही या प्रवासात खंबीर साथ दिल्याचं त्यांनी सांगितलं. अपयशानंतर केला जोमानं अभ्यास, लातूरची मुलगी बनली थेट न्यायाधीश, पाहा Video ‘प्लॅन बी’ होता तयार स्पर्धा परीक्षेत यश मिळालं नाही तर काय? या प्रश्नाचं उत्तरही मोनाली यांनी शोधलं होतं.  त्यांनी प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली यूजीसीची नेट परीक्षा दिली होती. या परीक्षेतही त्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्या होत्या. त्यानंतर कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना मोनाली यांनी न्यायाधिशांच्या परीक्षेतही पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलंय. त्यांच्या या प्रवासातून सोलापूरमधल्या अनेक नवोदित वकिलांना प्रेरणा मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या