मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Solapur : शिपायाच्या मुलीनं घडवला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश! Video

Solapur : शिपायाच्या मुलीनं घडवला इतिहास, पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश! Video

X
Success

Success Story : सोलापूर जिल्ह्यातल्या शिपायाची मुलगी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश झाली आहे. तिनं कसा केला हा प्रवास? तिच्या यशाचे शिल्पकार कोण आहेत? पाहूया

Success Story : सोलापूर जिल्ह्यातल्या शिपायाची मुलगी पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश झाली आहे. तिनं कसा केला हा प्रवास? तिच्या यशाचे शिल्पकार कोण आहेत? पाहूया

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर 25 जानेवारी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायालयाच्या अंतर्गत झालेल्या परीक्षांचे निकाल काही दिवसांपूर्वीच लागले. या परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीनं मात करणारे अनेक उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यांचे हे यश सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या एका शिपायाच्या मुलीनं या परीक्षेत यश मिळवलं असून ती पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश झाली आहे.

शिपायाची मुलगी न्यायाधीश

स्नेहा पुळुजकर असं या मुलीचं नाव आहे. स्नेहाचे वडील गेल्या 22 वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपायची नोकरी करतात. तर आई जिल्हा क्षयरोग केंद्रात कक्षसेविका आहे. स्नेहा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिचं पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण सेवा शिक्षण सेवा सदन प्रशालेमध्ये झालं.

शेतीत राबणारे हात न्यायदान करणार, ग्रामीण भागातील तरुणाची न्यायाधीशपदी निवड, Video

स्नेहानं त्यानंतर दयानंद कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केलं.ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये तिला गोल्ड मेडलही मिळालं आहे. स्नेहा एवढ्यावरच थांबली नाही वकिलीचं शिक्षण घेतानाही तिनं सुवर्णपदक पटाकावलं. आता पहिल्याच प्रयत्नात ती न्यायाधीश झाली आहे.

यशाचे शिल्पकार कोण?

दयानंद विधी महाविद्यालयात शिकत असतानाच स्नेहानं या परीक्षेची तयारी सुरू केली होती. अ‍ॅड. सत्यनारायण माने  आणि अ‍ॅड गणेश पवार यांनी तिला मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सुयश आणि सुजित या भावंडांनी तिची साथ कधीच सोडली नाही. स्नेहाला शांतपणे अभ्यास करता यावा, करिअरवर फोकस करता यावं म्हणून दिवस-रात्र झटणारे आई-वडिल हे तिच्या यशाचे खरे शिल्पकार आहेत.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अत्यंत साधारण परिस्थितीमध्येही यश संपादन करता येते, हे  या निमित्तानं मला सर्वांना सांगायचं आहे. आगामी काळात सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया स्नेहानं या यशानंतर दिली आहे.

First published:

Tags: Career, Local18, Solapur, Success story