JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / टीसीला आयकार्ड मागितलं अन् समोर आलं भलतंच प्रकरण; मुंबई- नागरकोइल ट्रेनमधील धक्कादायक प्रकार

टीसीला आयकार्ड मागितलं अन् समोर आलं भलतंच प्रकरण; मुंबई- नागरकोइल ट्रेनमधील धक्कादायक प्रकार

तरुणांच्या सतर्कतेमुळे मुंबई- नागरकोइल एक्स्प्रेसमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 11 फेब्रुवारी, प्रितम पंडित : मुंबई- नागरकोइल एक्स्प्रेसमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तोतया टीसीकडून तिकीट चेकिंगच्या नावाखाली प्रवाशांची लूट सुरू होती. या टीसीचा संशय आल्यानं बार्शीतील तीन तरुणांनी या टीसीकडे आयकार्डची विचारणा केली, मात्र त्याच्याकडे कुठलेही आयकार्ड नव्हते. हा टीसी तोतया असल्याचं समोर आल्यानंतर या तरुणांनी त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. या बनावट टीसीविरोधात कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीसी तोतया असल्याचा संशय   घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  मुंबई - नागरकोइल एक्स्प्रेस चार राज्यातून प्रवास करते. बार्शी शहरातील आकाश दळवी, मनीष देशपांडे आणि आकाश पवार हे याच ट्रेनने  मुंबईला जाण्यासाठी कुर्डूवाडी स्टेशन वरून बसले होते. त्यावेळी त्यांना तिकीट चेक करणाऱ्या टीसीचा संशय आला. त्यामुळे त्यांनी टीसीकडे ओळखपत्राची विचारना करून अधिक चौकशी केली असता तो तोतया असल्याचं समोर आलं. हेही वाचा :   Husband Killed Brother in Law : मध्यरात्री पत्नी भाऊजींसोबत नको त्या अवस्थेत सापडली, नवऱ्याने नात्याचा केला संतापजनक शेवट कर्जत रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल तो टीसी  तोतया असल्याचा संशय आल्यानंतर या तीनही तरुणांनी टीसीला काही प्रश्न केले. या प्रश्नाचे या व्यक्तीला समाधानकारक उत्तर न देता आल्यानं तो टीसी तोतया असल्याची तरुणांची खात्री पटली. त्यानंतर या तरुणांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून या तोतया टीसीला पोलिसांच्या हवाली केले. आरोपीवर कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या तरुणांनी दाखवलेल्या जागृततेमुळं त्यांचं सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या