जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Husband Killed Brother in Law : मध्यरात्री पत्नी भाऊजींसोबत नको त्या अवस्थेत सापडली, नवऱ्याने नात्याचा केला संतापजनक शेवट

Husband Killed Brother in Law : मध्यरात्री पत्नी भाऊजींसोबत नको त्या अवस्थेत सापडली, नवऱ्याने नात्याचा केला संतापजनक शेवट

Husband Killed Brother in Law : मध्यरात्री पत्नी भाऊजींसोबत नको त्या अवस्थेत सापडली, नवऱ्याने नात्याचा केला संतापजनक शेवट

भाऊजींचे आणि पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशय आल्याने आपल्या दाजींची रागाच्या भरात निर्घृण हत्या केली.

  • -MIN READ Local18 Uttarakhand
  • Last Updated :

डेहराडून, 10 फेब्रुवारी : उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. डेहराडून येथे एका व्यक्तीने भाऊजींची हत्या केली आहे. भाऊजींचे आणि पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशय आल्याने आपल्या दाजींची रागाच्या भरात निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पत्नीचे बहिणीच्या नवऱ्या सोबत शारिरीक संबंध असल्याचे समजताच नवऱ्याने भाऊजींची निघृण हत्या केली आहे. घटनेनंतर आरोपी मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी अवघ्या 6 तासांत आरोपीचा पकडले आहे. दरम्यान आरोपीस न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  बोलण्यात गुंतवून तरुणासोबत भयानक कांड; बीड हादरले, फरार आरोपींचा शोध सुरू

हत्येची ही हृदयद्रावक घटना डेहराडूनच्या रायपूरमधील मयूर विहार भागातील आहे. हरिराम (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिराम हा मजुरीचं काम करायचा. मृत बद्री उर्फ ​​विजय पाल हा त्याचा नात्यातील म्हणजे बहिणीचा नवरा होता. दोघेही सहस्त्रधारा रोडवरील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मजूर म्हणून काम करत होते. तिथे असताना त्यांनी राहण्यासाठी दोन तात्पुरत्या खोल्या केल्या होत्या.

हरिराम आपल्या पत्नीसह राहत होता. तर बद्री हा एकटाच राहत होता. दोघांनी रात्री दारू प्यायली आणि नंतर आपापल्या खोलीत झोपी गेले. या दरम्यान रात्री हरिरामला जाग आली यावेळी त्याची पत्नी खोलीत नव्हती. तो बद्रीच्या खोलीत गेला तेव्हा त्याची पत्नी तिथे होती. हरिरामला राग आला आणि त्याने तिथे ठेवलेल्या कुऱ्हाडीने बद्रीवर हल्ला केला. या दरम्यान बद्रीचा जागीच मृत्यू झाला.

जाहिरात

हे ही वाचा :  अवघ्या 11 दिवसांच्या बाळाचा जन्मदात्या बापानेच घोटला गळा; धक्कादायक कारण समोर

घटनेनंतर हरिराम तेथून फरार झाला. आजूबाजूच्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. हरिरामने मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात ISBT गाठले, जिथे पोलिसांनी त्याला पकडले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात