JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Uddhav Thackeray : 'पंतप्रधान अमेरिकेला चालले आहेत, पण त्यांनी...', उद्धव ठाकरेंचं मोदींना आव्हान

Uddhav Thackeray : 'पंतप्रधान अमेरिकेला चालले आहेत, पण त्यांनी...', उद्धव ठाकरेंचं मोदींना आव्हान

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांचं शिबीर घेतलं. या शिबिरामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला.

जाहिरात

उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांचं शिबीर घेतलं. या शिबिरामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. कागदावर पाहिलं तर माझ्याकडे काहीच नाही. ना पक्षाचं नाव आहे ना चिन्ह. सगळी पदं भोगून सत्तेच्या मोहापायी लाचार मिंधे खोक्यासाठी पलीकडे गेले. आता माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काहीच नाही. तरीही तुम्ही सोबत आहात, असं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले. ‘उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणि परवा जागतिक गद्दार दिन. आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला एक वर्ष होईल. तुम्ही जोपर्यंत माझ्यासोबत आहात तोपर्यंत कितीही शाह आणि अफझलखान आले तरी मला परवा नाही’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 20 जूनला जागतिक खोके दिन..’ आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, म्हणाले ‘लंडनमध्येही..’ ‘मोदींनी मणिपूरला जावं’ ‘हे उपरे आपल्या घरात येऊन दमदाट्या करतात, फोडाफोडी करतात. आम्ही नामर्द नाही. सत्तेची मस्ती आणि फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही. एवढीच मस्ती असेल तर मणिपूरमध्ये पाठवा. ईडी-सीबीआयचे अधिकारी मणिपूरमध्ये पाठवा. जातायत का बघा आणि गेले तर परत येतायत का बघा. जाळून टाकतील. तिकडे लोकं अमित शाह यांनाही जुमानत नाहीत. अमित शाह यांनी काय केलं? मोदी अमेरिकेत चालले आहेत, पण मणिपूरला जायला तयार नाहीत. विश्वगुरू अमेरिकेत जाऊन तुम्ही विकत घेतलेल्या लोकांसमोर तुमचं ज्ञान पाझळणार. रशिया-युक्रेनचं युद्ध थांबवलं अशी भाकडकथा सांगितली. ही भाकडकथा सत्य करयाची असेल तर मणिपूर शांत करा. मोदींनी मणिपूरमध्ये जाऊनच दाखवावं, बघू शांत होतं का’, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर? शिबीराच्या दिवशीच पोस्टर फाडले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या