समृद्धी महामार्गाबाबत महत्त्वाचा निर्णय
अजित मांढरे, प्रतिनिधी मुंबई : बुलढाणा बस अपतानानंतरही समृद्धी महामार्गावर अपघात होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. आजही समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाल्याची घटना घडली होती. वाढत्या अपघातांची मालिका पाहता राज्य सरकारने यासाठी ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा करणार सुरू करण्यात येणार आहे. अपघात झाल्यानंतर तिथे लवकर मदत पोहोचणं आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी राज्य सरकारचं बोलणं सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अपघात झाल्यास त्वरित सेवा मिळावी यासाठी नागपूर ते मुंबई दरम्यानच्या खाजगी महत्त्वाच्या हॉस्पिटल सोबत राज्य सरकार करार करणार आहे.
Accident News: समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; ट्रॅव्हल्सचा अक्षरशः चुराडाअपघात झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी एअर अॅंम्बुलन्स आणि हॉस्पिटलची सेवा मिळावा यासाठी लवकरच राज्य सरकार संबंधित कंपन्यांशी करार करणार आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या अपघातात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातामध्ये 20 जण जखमी झाले आहेत. त्यातील 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 9 जणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Bus Accident : आताची मोठी बातमी! सप्तश्रृंगी घाटात ST बस थेट दरीत कोसळली, 15 प्रवाशांचे जीव टांगणीलारात्रीच्या सुमारास खुराणा ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्गावर गेट नंबर 16 वर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आणि अनेक प्रवासीही जखमी झाले.