JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'राज्यात भ्रष्टाचार बोकाळलाय, बदल्यांमध्ये रेट..' अजित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले आम्ही सत्तेचा माज..

'राज्यात भ्रष्टाचार बोकाळलाय, बदल्यांमध्ये रेट..' अजित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले आम्ही सत्तेचा माज..

राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून बदल्यांमध्ये रेट ठरलेले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

जाहिरात

अजित पवारांचा गंभीर आरोप

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सातारा, 8 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा होती. या चर्चांना सध्यातरी पूर्ण विराम मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून बदल्यांचे रेट ठरल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. सातारा येथील कार्यक्रमात ते बोलत होते. काय म्हणाले अजित पवार? विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. आत्ताच्या सरकारमध्ये बदल्यांचे रेट ठरले आहेत. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. बदल्यांमध्ये रेट ठरलेले आहेत. सत्तेत आम्ही होतो पण सत्तेचा माज आम्ही केला नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला. आत्ताचे मंत्री कुणाला विचारत नाहीत, मंत्रालयात बसत नाहीत. वेगवेगळी लोकं कामं करुन देण्यासाठी मार्केटमध्ये फिरतायेत, असा गंभीर आरोप सुद्धा अजित पवार यांनी केला आहे. पवारांच्या प्रश्नावर अजित पवार भडकले शरद पवार यांनी मंगळवारी (2 मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर शरद पवार यांनी शुक्रवारी (5 मे) पुन्हा निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली. मात्र, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे चर्चेला उधाण आले. याबद्दल अजित पवार यांना विचारताच ते भडकल्याचे पाहायला मिळाले. ते बारामतीत माध्यमांशी बोलत होते. वाचा - संजय राऊतांवर टीका करताना अब्दुल सत्तारांचा तोल घसरला, थेट कुत्र्याशी केली तुलना शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला का आले नाहीत? असा सवाल ऐकून अजित पवार संतापले. पवार म्हणाले, शरद पवार यांनी याबाबत सांगितले आहे. मग काय… प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पीसी चाको आणि केरळचे आमदार उपस्थित होते. तसेच पत्रकार परिषदेत चार-पाचच खुर्च्या असतात. मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, “आमचे काही विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांनी केंद्र किंवा मणिपूरमधील लोकांना बोलावून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणावे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या