संजय राऊत
मुंबई, 8 मार्च : संजय राऊत यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘विधीमंडळ नव्हे चोर मंडळ’ असं वादग्रस्त व्यक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर संजय राऊत अडचणीत सापडले. संजय राऊत यांना विधीमंडळाकडून हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती, मात्र राऊत यांनी यावर कोणताही लेखी खुलासा सादर केला नाही. मात्र आता विधानसभा अध्यक्षांकडून हे प्रकरण आज विशेष अधिकार समितीकडे वर्ग होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार असल्यानं राज्यसभेचा मान राखण्यासाठी आता हे प्रकरण केंद्राकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. नेमंक काय म्हणाले होते राऊत? ‘विधीमंडळ नव्हे चोर मंडळ’ असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊत यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षातील आमदार आक्रमक झाले होते. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. आमदारांच्या मागणीनंतर समितीची स्थापना करण्यात आली. संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र राऊत यांनी या नोटीसीला लेखी उत्तर न दिल्यानं आता हे प्रकरण केंद्राकडे जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. …तोपर्यंत महापालिकांच्या निवडणुका होणार नाहीत; बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं प्रकरण राज्यसभेच्या विशेष अधिकार समितीकडे? आता हे प्रकरण राज्यसभेच्या विशेष अधिकार समितीकडे पाठवण्यात येणार आहे. राज्यसभेचा मान राखण्यासाठी हे प्रकरण केंद्राकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. संजय राऊत यांना पुन्हा म्हणणं मांडण्याची संधी द्यायची की नाही याबाबतचा निर्णय आता राज्यसभेची समिती घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.