JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विहिरीच्या पाण्यासाठी घरातली माणसं जिवावर उठली, काका-पुतण्याला सगळ्यांनी मिळून संपवलं

विहिरीच्या पाण्यासाठी घरातली माणसं जिवावर उठली, काका-पुतण्याला सगळ्यांनी मिळून संपवलं

विहिरीमध्ये पाण्याची पाळी कोणाची यावरून सकाळी वाद झाला. त्यानंतर वाद टोकाला पोहोचला आणि यातून..

जाहिरात

सांगलीच्या जत तालुक्यातल्या कोसारी या ठिकाणी ही घटना घडली.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

असिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली, 11 मार्च : जमिनीच्या तुकड्यासाठी भावा-भावात वाद नवे नाही पण सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीच्या पाण्याच्या वादावरून काका-पुतण्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात 3 जण जखमी झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीच्या जत तालुक्यातल्या कोसारी या ठिकाणी ही घटना घडली. विलास नामदेव यमगर, (वय 45) आणि प्रशांत दादासो यमगर (वय 23) असे मृत काका-पुतण्याची नावे असून सामाईक विहिरीच्या पाण्यावरून भावकीमध्ये झालेल्या हाणामारी दरम्यान हा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. (हॉटेलमध्ये आधी जेवले, नंतर रूममध्ये गेले आणि… ; लव्ह स्टोरीचा भयानक शेवट) जत तालुक्यातल्या कोसारी या ठिकाणी यमगर ही भावकी राहते. त्यांच्या शेतामध्ये एकच विहीर आहे. या विहिरीमध्ये पाण्याची पाळी कोणाची यावरून सकाळी वाद झाला. त्यानंतर वाद टोकाला पोहोचला आणि यातून एका यमगर कुटुंबातील सुमारे दहा ते पंधरा जणांनी विलास शंभर आणि प्रशांत यमगर यांच्या कुटुंबावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये विलास यमगर आणि प्रशांत यमगर या दोघांचा खून करण्यात आला. ( बायको घरी अन् प्रेयसीला भेटायला गेला 3 लेकारांचा बाप, गावकऱ्यांनी पाहिलं आणि असं काही केलं की.. ) तर या हल्ल्यात दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके  आणि विजय विलास यमगर जखमी झालेले आहेत. मृत आणि जखमी हे एकाच कुटुंबाशी संबंधित आहेत. तर दुसऱ्या यमगर कुटुंबापैकी कोणी जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जत पोलिसांनी धाव घेतली आहे. जखमींना जत शहरातल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोसारी या ठिकाणी सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या