मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /हॉटेलमध्ये आधी जेवले, नंतर रूममध्ये गेले आणि... ; लव्ह स्टोरीचा भयानक शेवट

हॉटेलमध्ये आधी जेवले, नंतर रूममध्ये गेले आणि... ; लव्ह स्टोरीचा भयानक शेवट

azamgad crime

azamgad crime

विशालचे त्याच भागात राहत असलेल्या मुलीवर प्रेम होते. दोघेही एका कॉलेजमध्ये बीटीसीत शिकत होते.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    आझमगढ, 11 मार्च : तरुणाने गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये जाऊन जेवल्यानंतर तिथेच रूममध्ये तिच्यावर गोळीबार केला आणि त्यानतंर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना आझमगढमध्ये घडलीय. जियानपूर कोतवाली भागात घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. काही कारणाने दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर प्रियकराने तिच्यावर गोळ्या झाडल्या. स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेत गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, जियानपूर कोतवाली भागात राहणाऱ्या विशालचे त्याच भागात राहत असलेल्या मुलीवर प्रेम होते. दोघेही एका कॉलेजमध्ये बीटीसीत शिकत होते. दोघेही लाटघाटातील हॉटेलमध्ये गेले होते. तेव्हा दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. तेव्हा चिडलेल्या विशालने प्रेयसीवर गोळी झाडली. यानंतर स्वत:वरही गोळी झाडून घेतली. यात विशालचा मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    बायको घरी अन् प्रेयसीला भेटायला गेला 3 लेकारांचा बाप, गावकऱ्यांनी पाहिलं आणि असं काही केलं की..

    गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल रुशिया यांनी सांगितलं की, तरुण आणि तरुणीने आधी हॉटेलमध्ये जेवण केलं. त्यानंतर तिथेच एक रूम भाड्याने घेतली. दरम्यान, काही वेळातच खोलीत गोळीबाराचा आवाज झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानतंर ते घटनास्थळी आले. पोलिसांनी जखमी तरुणीला रुग्णालयात पाठवले. तर तरुणाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

    First published:
    top videos

      Tags: Crime, Local18, Uttar pradesh