JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli News : उन्हाळ्यात महागाईचा चटका, कडधान्याचे दर कडाडले, पुढील काही महिने..... Video

Sangli News : उन्हाळ्यात महागाईचा चटका, कडधान्याचे दर कडाडले, पुढील काही महिने..... Video

जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्यानं वाढत आहेत. रोजच्या आहारातील कडधान्यांचे दर हे सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 2 जून : शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याची तक्रार अजूनही कायम आहे. त्याचवेळी बाजारपेठीत महागाई कमी होत नाहीय. जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्यानं वाढत आहेत. रोजच्या आहारातील कडधान्यांचे दर हे सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. सांगलीच्या बाजारपेठेतील डाळीच्या भावातही गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झाली आहे. किती झाली वाढ? सांगलीच्या बाजारपेठेत जानेवारी महिन्यात 94 ते 105 रुपये किलो होती. उन्हाळा वाढतात डाळीचे भावही वाढलेत. सध्यातुरडाळ 135 रुपये किलो दरानं विकली जात आहे. ती 150 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. अन्य डाळींच्या भावातही 4 ते 20 रुपयांची वाढ झालीय. शेतामधून नवी कडधान्य बाजारात येईपर्यंपत म्हणजेच सप्टेंबरपर्यंत डाळीचा वापर जपून करावा लागणार आहे.

देशातील  तुरीचं आगार असलेल्या मराठवाड्यात अतिवृष्टी आणि तीव्र थंडीचा परिणाम डाळीच्या उत्पादनावर झालाय. त्याचा परिणाम आता जाणवू लागलाय. मागणीइतका पुरवठा होत नसल्यानं डाळीचे दर वाढले आहेत, अशी माहिती सांगलीमधील व्यापारी गजानन पाटील यांनी दिली. कडाक्याच्या उन्हात कोंबड्यांचा जीव गुदमरला, देशी जुगाड करून वाचवला जीव! Video भारतात म्यानमार, सुदान तसंच आफ्रिकेतून तुरीची आयात होते. यंदा शुल्क हटवून आयात खुली केलीय. तरीही पुरेशी आयात झालेली नाही. त्यातच सुदानमधील यादवीमुळे तेथील डाळीचे आयात थंडावली आहे. त्याचबरोर आपल्याकडील तूर चवीला चांगली असल्यानं खाण्यासाठी विदेशी तुरीपेक्षा या तुरीला जास्त पसंती आहे. देशात उत्पादन कमी झाल्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसतोय, असं पाटील यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या