JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नवऱ्याला सुटी मिळत नसल्यानं पत्नी वैतागली; महिलेचा थेट अगारप्रमुखांच्या दालनात ठिय्या

नवऱ्याला सुटी मिळत नसल्यानं पत्नी वैतागली; महिलेचा थेट अगारप्रमुखांच्या दालनात ठिय्या

सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो नाकारल्यानं पत्नीने अगारप्रमुखांच्या दालनात आंदोलनाला सुरुवात केली आहे.

जाहिरात

सांगलीमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीचं आंदोलन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 13 मार्च, असिफ मुरसल  : सांगलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने रजेचा रीतसर अर्ज देऊनही तो नाकारल्यानं सांगलीच्या आटपाडी येथील एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने आगारप्रमुखाच्या दालनासमोर झोपून आंदोलन सुरू केलं आहे. हे अनोख आंदोलन जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. विलास कदम असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते गेल्या 33 वर्षांपासून राज्य परिवहन मंडळामध्ये चालक पदावर कार्यरत आहेत. ते 70 दिवसांनी निवृत्त होणार होणार आहेत. दोन दिवसांची रजा नाकारली  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विलास कदम हे गेल्या 33 वर्षांपासून एसटीमध्ये चालक म्हणून कार्यरत आहेत. ते सत्तर दिवसांनी निवृत्त होणार आहेत. त्यांची एकूण 270 दिवसांची रजा शिल्लक आहे. त्यांनी  आजारी पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 आणि 13 मार्च अशा दोन दिवसांच्या रजेसाठी अगारप्रमुखांकडे सहा मार्च रोजी अर्ज केला होता. मात्र अगारप्रमुखांकडून त्यांना सुटी नाकारण्यात आली. म्हशीचा धक्का लागला अन्..; कोल्हापुरात चिमुकलीचा धक्कादायक मृत्यू पत्नीचे आंदोलन   सुटी नाकारण्यात आल्यानं विलास कदम यांच्या पत्नी नलिनी संतप्त झाल्या. त्यांच्या पत्नीने आगारप्रमुखांच्या केबिनबाहेरच अंथरून टाकून आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाची सध्या सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणात आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या