JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli News: अशी स्मशानभूमी तुम्ही पाहिलीच नसेल; इथं येताच वाढतं लोकांचं 'ज्ञान', पाहा Video

Sangli News: अशी स्मशानभूमी तुम्ही पाहिलीच नसेल; इथं येताच वाढतं लोकांचं 'ज्ञान', पाहा Video

स्मशानभूमी म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो. परंतु, इस्लामपुरातील स्मशानभूमीत लहानांपासून मोठ्यांची वर्दळ आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 24 एप्रिल: नुसतं स्मशानभूमी म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. तेथील स्मशान शांततेचा विचारही नकोसा वाटतो. परंतु, याच शांततेचं ठिकाण अभ्यासासाठी उपयुक्त ठरत आहे. सांगली जिल्ह्यात ही अनोखी संकल्पना राबविली जात आहे. इस्लामपुरातील स्मशानभूमीत देशातील पहिले वाचनालय सुरू करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे लोकराज्य विद्या फाउंडेशनने सुरू केलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी सक्रीय पाठिंबा दिला आहे. वाचन संस्कृती जपण्याची गरज सध्याच्या काळात कुणीही मोबाईलशिवाय राहू शकत नाही. अनेकांसाठी मोबाईल हे व्यसन झालं आहे. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी आणि इतर लोकही तासनतास मोबाईलवर घालवत असतात. परंतु, याचा परिणाम समाजातील वाचन संस्कृतीवर होत आहे. पुस्तकं वाचण्याकडे सर्वांचेच दूर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून चांगली वाचनालयं असणं गरजेचं असतं. त्यासाठीच इस्लामपूरमधील लोकराज्य विद्या फौंडेशननं अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

थेट स्मशानभूमीत सुरू केलं वाचनालय अभ्यासासाठी शांत ठिकाण असणं गरजेचं असतं. सध्याच्या धावपळीच्या जगात अशी ठिकाणे कमी राहिलेली दिसतात. त्यामुळे लोकराज्यने इस्लामपुरात थेट स्मशानभूमीत वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच देशातील पहिलेच स्मशानभूमीतील वाचनालय सुरू केले. त्यासाठी पुस्तकांची व्यवस्था करण्यात आली. आता या वाचनालयाचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे. सुरुवातीला विरोध आणि मग सहभाग लोकराज्यने स्मशानभूमीत वाचनालय सुरू करण्याचा क्रांतिकारी विचार मांडला. तसेच घरोघरी जावून मुलांना व पालकांपुढे हा विचार मांडला. तेव्हा पालकांनी मुलांना स्मशानात पाठवण्यास विरोध केला. वाचनालयासाठी स्मशानभूमी ही बाब सर्वांनाच न पटणारी होती. तरीही सर्वांना स्मशानभूमीबाबत माहिती दिल्यानंतर काही पालकांनी याबाबत विचार केला. विद्यार्थ्यांना सुरुवातीला स्मशानात जाण्यास भीती वाटत होती. मात्र, त्यानंतर भीती संपत गेली आणि शांततेमुळं अभ्यास, वाचन होऊ लागलं, असं विद्यार्थी सांगतात. तसेच आता विद्यार्थ्यांसोबत पालकही स्मशानभूमीत येऊन वाचत बसतात. अंत्यविधीसाठी आलेले लोकही काही काळ या ठिकाणी पुस्तके चाळतात. अपघातानं सुटली कुस्ती, पण पैलवानानं ‘या’ क्षेत्रात मारलं मैदान, Video वाचनालयाचा दुहेरी फायदा इस्लामपूरमधील स्मशानभूमीतील वाचनालयाचे विविध फायदे झाले आहेत. स्मशानभूमीत नेहमीच स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असतो. परंतु, या माध्यमातून लोकराज्यच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीची स्वच्छता केली. या कामात त्यांना परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनीही मदत केली. आता हा परिसर स्वच्छ राहत आहे. तसेच स्मशानाबाबत असणारे विद्यार्थी आणि पालकांचे गैरसमज संपले आहेत. अंधश्रद्धा निर्मुलनाच्या अनुषंगाने हा उपक्रम फायद्याचा ठरला आहे. तसेच विद्यार्थ्यांना शांत आणि सोयीचं ठिकाण अभ्यासासाठी उपलब्ध झालं आहे. त्यामुळे ‘लोकराज्य’च्या या क्रांतीकारी निर्णयाचे सर्वजण स्वागत करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या