सांगली, 15 मार्च : सांगलीतील (Sangali) भाजपचे माजी आमदार (BJP MLA) आणि ज्येष्ठ नेते संभाजी पवार (Sambhaji Pawar) यांचं निधन झालं आहे. ते 80 वर्षांचे होते. बिजली मल्ल म्हणून संभाजी पवार यांची विशेष ओळख होती. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दुपारी 12 वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. संभाजी पवार हे गेल्या काही वर्षांपासून पार्किन्सनच्या आजाराने त्रस्त होते. मागील वर्षी त्यांना उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु, कोरोनालाही संभाजी पवार यांनी मात दिली होती. भाजप खासदाराच्या सुनेनं केला आत्महत्येचा प्रयत्न, पतीवर केले गंभीर आरोप संभाजी पवार यांची मल्ल हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्रात ओळखले जात होते. कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्या मल्लाला अवघ्या काही क्षणात चितपट करून आस्मान दाखवण्यात संभाजी पवार हे तरबेज होते. त्यामुळेच महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. याच जोरावर त्यांनी राजकीय आखाड्यात नशीब आजमावून पाहिले आणि . वसंतरावदादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णु अण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करून त्यांनी जायंट किलर अशी ख्याती मिळवली. शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडणाऱ्या संभाजी पवार यांना भारतीय जनता दलाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती. OMG! हा तर चक्क फ्रिजमध्ये जाऊन बसला, फोटोवर नेटकऱ्यांनी दिल्या धमाल प्रतिक्रिया 2009 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 2014 साली पक्षातील स्थानिक नेत्यांशी झालेल्या मतभेदानंतर ते राजकीय दृष्ट्या बाजूला झाले होते. मात्र, तरी सातत्याने विविध प्रश्नांवर ते आपली मते मांडत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा मोठा परिवार आहे. सर्वसामान्यांचा नेता हरपल्याची हळहळ सांगलीत व्यक्त होत आहे. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता जनतेला अंत्यदर्शनासाठी घेता येणार आहे.