JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एकमेकांकडे बघितल्याचा राग अन् क्षणात सगळंच संपलं, तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

एकमेकांकडे बघितल्याचा राग अन् क्षणात सगळंच संपलं, तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

एकमेकांकडे बघितल्याचा राग इतका अनावर झाला की तीन तरुणांनी मिळून त्याला संपवलं.

जाहिरात

सांगली क्राइम न्यूज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आसिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली : सहज म्हणून एकमेकांकडे पाहिलं जातं. मात्र त्यातूनही वाद होऊन काहीतरी भयंकर घडेल असा विचार कधी केला आहे का? सांगलीमधील तरुणासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. एकमेकांकडे बघितल्याचा राग इतका अनावर झाला की तीन तरुणांनी मिळून त्याला संपवलं. सांगली शहरामध्ये पाठलाग करत महाविद्यालयीन तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शहरातच भर रहदारीच्या ठिकाणी अशा पद्धतीने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जीव घेण्यात आला. एकमेकांकडे रागाने बघण्याच्या कारणातून एका तरुणाचा तीन तरुणांनी खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. राजवर्धन राम पाटील,वय 18 असे या मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो वसंतदादा औद्योगिक परिसरातील शासकीय आयटीआयमध्ये शिकत होता.

मालकाला जमिनीत पुरलं, म्हशीचे सांगाडे टाकले, पण हात बाहेर आला अन् तो फसला

राजवर्धन पाटील आणि तीन तरुणांमध्ये एकमेकांकडे बघण्याच्या रागातून काही दिवसापासून वाद सुरू होता. गुरुवारी संध्याकाळी वसंतदादा साखर कारखान्याच्या गेट समोर राजवर्धन पाटील आणि तीन तरुणांमध्ये जोरदार वाद झाला. तीन तरुणांनी राजवर्धनचा काटा काढण्यासाठी चाकू आणि कोयता घेऊन त्याचा पाठलाग करत होते. कारखान गेटच्या हद्दीत या हल्लेखोरांनी राजवर्धनला गाठून त्याच्यावर कोयता आणि चाकूने वार करत त्याची हत्या केली.

पुणेकरांनो, सावधान! तुम्हाला असा टास्कचा मेसेज आला का? फक्त 10 जणांना दीड कोटींना गंडवलं

संबंधित बातम्या

गुरुवारी संध्याकाळी राजवर्धन वसंतदादा कारखाना परिसरात आला असता हल्लेखार तरुण आणि राजवर्धन यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संजयनगर पोलीस पुढील तपास करत आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या