जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / पुणेकरांनो, सावधान! तुम्हाला असा टास्कचा मेसेज आला का? फक्त 10 जणांना दीड कोटींना गंडवलं

पुणेकरांनो, सावधान! तुम्हाला असा टास्कचा मेसेज आला का? फक्त 10 जणांना दीड कोटींना गंडवलं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सायबर क्राईमचा हा नवा फंडा नेमका काय आहे, याबाबत जाणून घेऊयात.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 13 एप्रिल : सायबर भामट्यांनी आता टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली सावज हेरून लोकांना लुटण्याचा नवा धंदा सुरू केला आहे. एकट्या पुणे शहरात गेल्या आठवड्यातच सायबर बँचकडे अशा प्रकारच्या 10 तक्रारी दाखल आहे. तसेच अंदाजे दीड-दोन कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. सायबर क्राईमचा हा नवा फंडा नेमका काय आहे, याबाबत जाणून घेऊयात.

News18लोकमत
News18लोकमत

टेलिग्रामवर टास्क गेम खेळताय, तर सावधान व्हा. नाहीतर चार पैशांच्या लोभापाई सर्वस्व गमावून बसाल. हा टास्क फ्रॉड नेमका आहे तरी काय? हे जाणून घ्या. तुमच्या मोबाइलवर टेलिग्राम आहे आणि त्यावरून तुम्हाला काही पैशांच्या बदल्यात टास्क पूर्ण करायला सांगणारी, ही अशी लिंक खुणावत असेल तर अजिबात तिच्या मोहात पडू नका. कारण एकट्या पुण्यात आठवड्यात या प्रकारच्या 10 तक्रारी दाखल आहेत. तसेच तीन गुन्ह्यातील फसवणुकीचा आकडा तर काही लाखांच्याही पुढे आहे. साबयर क्राईमच्या या नव्या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी नेमकी आहे ते जाणून घ्या. याबाबत सायबर क्राईम ब्रँचच्या इनचार्ज मिनल पाटील यांनी माहिती दिली. सायबर भामट्यांचे इतर फंडे लोकांना परिचित झाल्याने त्यांन कंम्लिट टास्क आणि अर्न मनीचा नवा फंडा शोधून काढला आहे. म्हणूनच कुणी तुम्हाला लाईक्सचे पैसे मिळवून देत असेल तर अजिबात त्याला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

हल्ली सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांना साधे आरोपींपर्यंत पोहोचणेही जिकरीचे होऊन बसले आहे. कारण बहुतांश वेळा हे आरोपी एकतर परप्रांतीय किंवा मग थेट परदेशातून, असे ऑनलाइन फ्रॉड करत असतात. म्हणूनच जास्त परतव्याच्या अमिषाला अजिबात बळू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात