जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / मालकाला जमिनीत पुरलं, म्हशीचे सांगाडे टाकले, पण हात बाहेर आला अन् तो फसला

मालकाला जमिनीत पुरलं, म्हशीचे सांगाडे टाकले, पण हात बाहेर आला अन् तो फसला

मालकाला जमिनीत पुरलं, म्हशीचे सांगाडे टाकले, पण हात बाहेर आला अन् तो फसला

मालकाच्या त्रासाला कंटाळून नोकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने मालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना टिटवाळ्यात उघडकीस आली आहे.

  • -MIN READ Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
  • Last Updated :

गणेश गायकवाड, प्रतिनिधी टिटवाळा, 13 एप्रिल : मालकाच्या त्रासाला कंटाळून नोकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने मालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना टिटवाळ्यात उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर नोकराने मालकाचा मृतदेह पुरला त्यावर मेलेल्या म्हशीचा अवशेष टाकले, मात्र दोन दिवसानंतर मृतदेह फुगून हात बाहेर आला आणि क्रूर हत्येचा उलगडा झाला. सचिन माम्हाने असे मयत मालकाचे नाव असून या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी सुनील मौर्या या नोकरासह त्याचे साथीदार शुभम गुप्ता ,अभिषेक मिश्रा यांना बेड्या ठोकल्यात . टिटवाळा परिसरात सचिन म्हामाने यांचे इन्व्हर्टर आणि इलेक्ट्रिकचे दुकान आहे, मात्र 7 एप्रिलला सचिन कामानिमित्त बाहेर गेला. घरी परतले नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी सचिन बेपत्ता असल्याची तक्रार दिली. याआधी सचिनच्या दुकानात त्याची पत्नी अधून मधून येत असे. यावेळी कामाला असलेला सुनील मौर्या हा पत्नीकडे वाईट नजरेने बघतो, असा संशय सचिन ला होता, त्यामुळे तो त्याला काम करताना ओरडायचा आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी द्यायचा, त्यामुळे मालकाला सुनील वैतागला होता, मग त्याने साथीदारांच्या मदतीने सचिनचा काटा काढायचे ठरवले.

News18लोकमत
News18लोकमत

सुनिलने दहागांव भागात एक फार्म हाऊस मध्ये इन्व्हर्टर आणि इलेक्ट्रिक काम असल्याचा बहाणा करत सचिनला आपल्या सोबत नेले आणि तिथे एका निर्जळ स्थळी त्याने आणि त्याच्या साथीदाराने गळा होऊन त्याची हत्या केली. त्यावेळी त्याचा मृतदेह कोणाला दिसू नये म्हणून खड्डा करून त्यात पुरला आणि त्यावर पालापाचोळा आणि मेलेल्या म्हशीचे अवशेष टाकले, मात्र दोन दिवसानंतर मृतदेहाचा हात बाहेर आला आणि त्यांचा भांडाफोड झाला. तपास करत असताना पोलिसांना दहागाव परिसरामध्ये सचिनच्या गाडीची तोडफोड झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी शोधाशोध करत असताना सचिनचा मृतदेह त्यांना दिसून आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात