JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Irshalgad Landslide : खालापूरमधील गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना, 60 हून अधिक लोक मलब्याखाली अडकले

Irshalgad Landslide : खालापूरमधील गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना, 60 हून अधिक लोक मलब्याखाली अडकले

मुसळधार पाऊस पडत असताना घडलेल्या या घटनेत काही जणांचा जीव गेला असल्याचीही माहिती समोर येत आहे. तर, काही नागरिक सुखरूप वाचले आहेत.

जाहिरात

इरसालगड या गावात दरड कोसळली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायगड 20 जुलै : रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आता खालापूर तालुक्यातील इरसालगड या गावातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. या वाडीवर दरड कोसळली आहे. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या या वस्तीवर दरड कोसळली आहे. 50 ते 60 घरांची ही वस्ती आहे. ही घटना बुधवारी रात्री 11.30 ते 12 वाजताच्या दरम्यान घडली. मुसळधार पाऊस पडत असताना घडलेल्या या घटनेत काही जणांचा जीव गेला असल्याचीही माहिती समोर येत आहे. तर, काही नागरिक सुखरूप वाचले आहेत. काही अद्यापही खाली अडकलेले आहेत. अनेकजण मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. Maharashtra Rain : धोका टळला नाही, उद्याही राज्याच्या या भागांमध्ये पाऊस कोसळणार! उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरसालगड येथे ही घटना घडली आहे. इथे एकूण ४६-५० घरं आहेत . 25 लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मुख्यमंत्री सातत्याने संपर्कात असल्याचं सांगत निसर्गासामोर कोणाचं काही चालत नाही, असंही ते म्हणाले. समोर येत असलेल्या माहितीनुसार, या गावात मोठ्या प्रमाणा गाई म्हशीसुद्धा ढीगाऱ्याखाली अडकले आहेत. तर, 60 पेक्षा अधिक लोक ढीगाऱ्याखाली अडकले आहेत. 4 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. NDRF ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सतत पाऊस असल्याकारणामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इरसालगड  येथे जाण्यास रवाना झाले आहेत. तर उदय सामंत आणि दादा भुसे याठिकाणी पोहोचले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या