JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: पुण्याजवळ वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे, वैतागून गाडीतून उतरल्या अन्..., पाहा पुढे काय घडलं

VIDEO: पुण्याजवळ वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे, वैतागून गाडीतून उतरल्या अन्..., पाहा पुढे काय घडलं

हडपसर ते सासवडच्या प्रवासादरम्यान सुप्रिया सुळेही ट्राफिक जॅममधे अडकल्या होत्या. मग अखेर त्यांनीच गाडीमधून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे 20 ऑक्टोबर : वाहतूक कोंडीची समस्या सध्या अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीला अनेकदा राजकीय नेतेमंडळीही वैतागल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच हा प्रकार सुप्रिया सुळे यांच्यासोबत घडला. हडपसर ते सासवडच्या प्रवासादरम्यान सुप्रिया सुळेही ट्राफिक जॅममधे अडकल्या होत्या. मग अखेर त्यांनीच गाडीमधून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. कोकणात राडा, भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेक, पेट्रोलची बॉटलही फेकली बराच वेळ वाहूतक कोंडी झाल्याचं पाहून अखेर सुप्रिया सुळे स्वत: गाडीमधून खाली उतरल्या. यानंतर रस्त्यावर उतरून त्यांनी स्वतः ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः आपला हा व्हिडीओ ट्विट केला आहे. एक छोटा ट्रक बंद पडल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः गाडीतून उतरून आजूबाजूच्या वाहनांना वाट करून दिली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं.

संबंधित बातम्या

हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी वाहतूक कोंडीची समस्या सांगत कॅप्शनमध्ये लिहिलं की ‘हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी ‘टॉप प्रायोरिटी’वर लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते. आता तर अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड वाहतूक कोंडी होते.’ दातांची सर्जरी सुरु असताना गेली लाईट; मंत्री भुमरेंनी तिथेच केला जनरेटर मंजूर आपल्या ट्विटमध्ये त्यांनी नितीन गडकरी यांना टॅग करत हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, की ‘याचा नागरीकांना प्रचंड त्रास आणि मनस्ताप होत आहे. तरी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी आपणास नम्र विनंती आहे की, हे काम तातडीने हाती घेऊन ते मार्गी लावणे आवश्यक आहे. कृपया याबाबत सकारात्मक विचार करावा.’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या