सिंधुदुर्ग, 19 ऑक्टोबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. अशातच आता भास्कर जाधव यांच्या घरावर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली आहे. जाधव यांच्या घराच्या बाहेर पेट्रोलच्या बॉटल आणि स्टम्प सुद्धा आढळून आल्या आहेत.
भास्कर जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण याणे आणि त्यांची मुलं आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी जाधव यांच्यावर जशास तसे उत्तर पलटवार केला होता. पण, आता ही शाब्दिक लढाई मुद्यावरून गुद्यावर आली आहे.
('खिसे कापणारे महाठग', बच्चू कडू यांचा राणा दाम्पत्यावर घणाघाती 'प्रहार')
आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी भास्कर जाधव यांच्या घरावर दगडफेक केली. यावेळी भास्कर जाधव यांच्या घराच्या बाहेर पेट्रोलच्या बॉटल, हॉकी स्टीक आढळून आल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी जाधव यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे.
दरम्यान, कुडाळच्या मोर्चात भास्कर जाधव यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. कुडाळनंतर कणकवली पोलीस स्थानकात ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आहे. रात्री उशिरा मोठया संख्येने जमलेले भाजपचे कार्यकर्ते कणकवली पोलीस स्थानकात गेले आणि जोपर्यंत भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असा पवित्रा घेतला. अखेर कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगताच कार्यकर्ते निघून गेले .त्यानुसार कुडाळ पोलीस स्थानकात भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले होते भास्कर जाधव?
'नारायण राणे म्हणजे कोंबडी चोर आणि त्यांचा मुलगा निलेश राणे म्हणजे चरसी अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व निलेश राणे यांच्यावर जहरी टीका केली होती. सिंधुदूर्ग जिल्ह्यात आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्च्यात आमदार जाधव सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी टीका करतानाच नारायण राणे यांची मिमिक्री करत राणेंवर निशाणा साधला.
(दातांची सर्जरी सुरु असताना गेली लाईट; मंत्री भुमरेंनी तिथेच केला जनरेटर मंजूर)
'मी 1996 पासून व्यावसायिक असून मी जे केलं ते कागदावर दाखवलं. वडिलांच्या निधनानंतर त्याची वडिलोपार्जित मालमता वारस हक्काने मालमत्ता वाढली. माझ्याबद्दल जास्त अभ्यास नितेश राणेंकडे आहे मात्र जर त्यांनी हे आरोप सिद्ध केल्यास आणि ज्याचा हिशेब नसेल तर मी स्वतः आत्महत्या करेन. वडिलांच्या पैशावर आज आमदार नितेश राणे जीवन जगतात त्यांचा स्वत:च एकही असा व्यवसाय नाही, अशी टीका जाधव यांनी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.