पवार कुटुंब फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप रोहित पावर यांनी केला.

शरद पवार यांच्या आई या शेतकरी कामगार पक्षाच्या सक्रीय नेत्या होत्या. 

गोविंद पवार आणि शारदाबाई पवार यांना एकूण 11 मुलं. 7 मुलं आणि 4 मुली. 

क्रम: वसंतराव, दिनकरराव, अनंतराव, माधवराव, सूर्यकांत, सरला (जगताप), सरोज (पाटील), शरद, मीना (जगधने), प्रताप, नीला

यातील फक्त शरद पवारच राजकारणात सक्रिय उतरले. बाकीच्यांनी इतर क्षेत्रात नाव कमावलं.

शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबातून अजित पवार आणि सुप्रिया सुळे राजकारणात आले. 

पुढे आप्पासाहेबांचे चिरंजीव राजेंद्र यांचा मुलगा रोहितही राजकारणात आले. 

रोहित राजकारणात असताना, अजित पवार यांचा मुलगा पार्थही राजकारणात उतरले. 

अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. 

पार्थ यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून निवडणूक लढवली होती. 

पार्थ यांच्या उमेदवारीस शरद पवार अनुकूल नसल्याचं स्पष्ट झालं होतं. 

त्यावेळीही पवार कुटुंबात धुसफूस सुरू असल्याची चर्चा झाली होती.