JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाविकांना घेऊन जाणाऱ्या एसटी आणि मिनी बसची धडक, भीषण अपघाताचे PHOTO समोर

भाविकांना घेऊन जाणाऱ्या एसटी आणि मिनी बसची धडक, भीषण अपघाताचे PHOTO समोर

बीड तालुक्यातील वानगाव फाटा येथे हा भीषण अपघात झाला. जखमी भाविकावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जाहिरात

पंढरपूरच्या दिशेनं जाणाऱ्या मिनी बसचा अपघात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, प्रतिनिधी सुरेश जाधव, 29 जुलै : अपघाताचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. आज सकाळी बुलढाण्यातील मलकापूरमध्ये भीषण अपघात झाला. त्यापाठोपाठ पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस आणि मिनी बसचाही भयंकर अपघात झाला आहे. बीडहून पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या एसटी बसला पाठीमागून मिनी बसने जोरदार धडक दिली आहे. या बसच्या धडकेत 15 जण जखमी झाले आहेत.  बीड तालुक्यातील वानगाव फाटा येथे हा भीषण अपघात झाला. जखमी भाविकावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील कोंडी कुटुंब पंढरपूरला मिनी बसमधून जात होते. बीडपासून काही अंतरावर असलेल्या वाणगाव फाट्याजवळ ही मिनीबस बीडहून पंढरपूरकडे निघालेली एस.टी. बसला जोरदार धडकली आहे.

एसटी बसचा भीषण अपघात; टायर फुटल्यानं 41 प्रवाशांची बस झाडावर आदळली

या अपघातात कोंडी कुटुंबासह अन्य काही जण मिळून 15 जण जखमी झाले आहेत. यातील दोघांना गंभीर स्वरुपाचा मार लागला आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

अपघात रोखण्याचा स्पीडब्रेकरच ठरतोय जीवघेणा, रिक्षा उलटल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद

संबंधित बातम्या

बुलढाण्यात सकाळी मलकापूरजवळ भीषण अपघात झाला होता. दोन बसच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांपर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे. तर १५ हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या