जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : अपघात रोखण्याचा स्पीडब्रेकरच ठरतोय जीवघेणा, रिक्षा उलटल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद

VIDEO : अपघात रोखण्याचा स्पीडब्रेकरच ठरतोय जीवघेणा, रिक्षा उलटल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद

अपघात रोखण्याचा स्पीडब्रेकरच ठरतोय जीवघेणा

अपघात रोखण्याचा स्पीडब्रेकरच ठरतोय जीवघेणा

स्त्यावर अनेक अपघात घडतात. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत आहे. एकापेक्षा एक भीषण अपघाताच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे रस्त्याने वाहने चालवताना नेहमीच सतर्कता बाळगण्यास सांगितले जाते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सुरेश जाधव, बीड, 29 जुलै: रस्त्यावर अनेक अपघात घडतात. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत आहे. एकापेक्षा एक भीषण अपघाताच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे रस्त्याने वाहने चालवताना नेहमीच सतर्कता बाळगण्यास सांगितले जाते. अशातच बीडमध्ये स्पीडब्रेकर जीवघेणे ठरत असल्याचं दृश्य समोर आलं आहे. याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. यामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. बीडच्या माजलगाव शहरात पाण्याच्या टाकीसमोर अनधिकृत स्पीडब्रेकर आहे. महामार्गावरील अनाधिकृत स्पीडब्रेकर अपघाताला आमंत्रण देत आहेत. या महामार्गावर नुकतीच एक तीन चाकी रिक्षा पलटी झाली.

News18लोकमत
News18लोकमत

उंच असलेल्या स्पीडब्रेकरवर रिक्षाचे पुढचे चाक गेल्यानंतर रिक्षा पुढच्या बाजूने पुर्ण उचलटी. यामुळे वाहन चालकाला मनस्ताप सहन करावा लागला. दररोज या ठिकाणी असेच अपघात होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे तात्काळ हे स्पीडब्रेकर हटवावेत अशी मागणी होत आहे.

जाहिरात

गेवराई रोडवर असलेल्या पाण्याच्या टाकीसमोर एकाला एक चिकटून दोन मोठ्या आकारातील अनधिकृत स्पीडब्रेकर उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होतात. चारचाकी वाहने देखील अपघातग्रस्त होतात. त्यामुळे हे गतिरोधक काढून त्याठिकाणी आकाराने छोटे व एकच गतिरोधक टाकावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात