नितेश राणे
मुंबई, 13 मार्च : शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे. शिंदे गटाकडून ठाकरे गटावर आरोप करण्यात येत आहेत. आता या वादात भाजप नेते नितेश राणे यांनी देखील उडी घेतली असून, त्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच शीतल म्हात्रे यांची बदनामी झाली त्याचा हिशोब द्यावा लागेल, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला आहे. नेमकं काय म्हटलं राणेंनी? शितल म्हात्रे यांच्या व्हिडीओबाबत आज चर्चा झाली. हा व्हिडीओ मॉर्फ करण्यात आला आहे, त्याबाबत काही नावं समोर आली आहेत. मातोश्री नावाच्या पेजवरून हा व्हिडीओ पोस्ट झाला आहे. युवासेनेच्या दोन कार्यकर्त्यांनी हे केलं आहे, आणि त्याच्या मागचा मास्टरमाईंड हा कलानगमध्ये असल्याचं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. जळगावात महाजनांचा राष्ट्रवादीला धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश राणेंचा इशारा पुढे बोलताना नितेश राणे यांनी म्हटलं की, यांच्यासोबत जे आहेत ते चांगले आणि सोडून गेले ते वाईट. जर खरच मर्दानगी असेल तर समोर येऊन बोला. तुम्ही जर हा खेळ सुरू केला तर आम्ही पण करू. पार्टीचे अनेक व्हीडीओ आहेत , कलानगरमध्ये बसून बदनामी सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीजे. शीतल म्हात्रे यांची बदनामी झाली, त्याचा हिशोब द्यावा लागेल असा इशारा राणेंनी दिला आहे.