जळगाव, 13 मार्च : जळगावमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पाचोरा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी आतापासूनच भाजपकडून रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हे पक्षांतर महत्त्वाचे मानले जात आहे.
गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पाचोरा तालुक्यातील लोहारा गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला भाजपकडून हा मोठा धक्का मानला जात आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जळगावात हा प्रवेशसोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा मोठा फायदा हा भाजपला होण्याची शक्यता आहे.
खडसेंना धक्का
दरम्यान दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निकाल लागला. या निवडणुकतही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का बसला आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांचे समर्थक संजय पवार यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार निवडीचे अधिकार एकनाथ खडसे यांना देण्यात आले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असं मानलं जात होतं. अध्यक्षपदासाठी पक्षाकडून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी संजय पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते विजयी देखील झाले. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र पाटील यांचा पराभव झाला आहे. तर उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे अमोल पाटील हे विजयी झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Girish mahajan, Jalgaon, NCP