JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / काँग्रेसमध्ये नवा ट्वीस्ट, नाना पटोलेंच्या नव्या मागणीमुळे पक्षश्रेष्ठी नाराज?

काँग्रेसमध्ये नवा ट्वीस्ट, नाना पटोलेंच्या नव्या मागणीमुळे पक्षश्रेष्ठी नाराज?

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदासोबत केली कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावाची घोषणा लांबणीवर…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 जानेवारी : नवीन वर्षात काँग्रेसमध्ये (Congress) अनेक फेरबदल होणार आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची निवड निश्चित समजली जात आहे. पण, पटोले यांनी अध्यक्षपदासोबतच कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या अधिकृत घोषणेआधीच पटोले यांनी केलेल्या मागणीमुळे काँग्रेस वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. दिव्य मराठी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, नाना पटोले यांची प्रदेशाध्यपदी निवड ही निश्चित झाली आहे. लवकरच काँग्रेसकडून याबद्दल घोषणा होण्याची शक्यता आहे. पण, त्याआधीच नाना पटोले यांनी आणखी एक मागणी केली आहे. नाना पटोले यांनी प्रदेश अध्यक्षपदासोबत कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नावाची घोषणा लांबणीवर टाकल्याचे वृत्त आहे. India – China Standoff: ‘पूर्णपणे माघार घ्या’, भारतानं चीनला ठणकावलं! नाना पटोले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यापैकी एक मंत्रिपद आपल्याला देण्यात यावे अशी मागणी केली, असल्याची माहिती समोर आली आहे. पटोले यांच्या या मागणीमुळे काँग्रेस हायकमांडने नाराजी व्यक्त केली आहे. ‘जय श्रीराम’च्या नाऱ्यावर चिडू नये, सेनेचा ममतादीदींना सल्ला आणि भाजपवरही टीका बाळासाहेब थोरात यांच्याकडे मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद आणि विधिमंडळ नेतेपद असल्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यपद सोडण्यास तयारी दाखवली आहे. प्रदेशाध्यक्षपदावर पूर्ण वेळ कुणी तरी असावे असा मत प्रवाह निर्माण झाला होता. त्यामुळेच विदर्भातील नेता आणि धडाकेबाज स्वभाव असल्यामुळे नाा पटोले यांची निवड निश्चित झाली होती. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यासाठी मंजुरी सुद्धा दिली होती. पण, आता नाना पटोले यांच्या या नव्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या