JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सांगली हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या

सांगली हादरलं! राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या

तीन अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने दत्तात्रय पाटोळे यांचा पाठलाग करून सपासप वार केले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 10 जुलै: राष्ट्रवादी काँग्रेसचे कुपवाड शहर उपाअध्यक्ष दत्तात्रय पाटोळे (वय- 45, रा. कुपवाड) यांनी निर्घृण हत्या झाली आहे. तीन अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने दत्तात्रय पाटोळे यांचा पाठलाग करून सपासप वार केले. कुपवाड एमआयडीसीतील रोहिणी कोल्ड स्टोअरेजमध्ये शुक्रवारी दुपारी हा थरार घडला. या घटनेमुळे सांगली जिल्हा हादरला आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहे. पूर्ववैमनस्यातून  दत्तात्रय पाटोळे यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, खुनाच्या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांशी चर्चा केली. हेही वाचा… ‘विकास दुबे हा अट्टल गुन्हेगार होताच मात्र त्याच्यापेक्षाही शातिर निघाले पोलिस’ सांगलीतील मिरज औद्योगिक वसाहतीतील रोहिणी कोल्ड स्टोअरेजमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांचा तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला आहे. राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्याची हत्या झाल्यानं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे हे शुक्रवारी दुपारी दुचाकीने मिरज औद्योगिक वसाहतीकडे निघाले होते. तीन मारेकऱ्यांनी दत्तात्रय पाटोळे यांचा पाठलाग करून त्यांच्यावर चाकू, चॉपर आणि कोयत्याने सपासप वार केले. त्यातच दत्तात्रय पाटोळे यांचा जागेवरच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तिन्ही मारेकरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मारेकऱ्यांनी तोंडावर रुमाल बांधले होते. हेही वाचा… हातात पिस्तूल घेत फिल्मी अंदाजात डायलॉगबाजी करणं तरुणाला पडलं महागात दत्तात्रय पाटोळे यांची हत्या पूर्ववैमनस्यातून सुपारी देऊन करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यानुसार संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या