JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik News : शरद पवार यांना विठ्ठल, पांडुरंग म्हणणे थांबवा; बडव्यांचा उल्लेख करू नका; वैदिक धर्मसभेचा इशारा

Nashik News : शरद पवार यांना विठ्ठल, पांडुरंग म्हणणे थांबवा; बडव्यांचा उल्लेख करू नका; वैदिक धर्मसभेचा इशारा

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षातील दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

जाहिरात

शरद पवार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 11 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षातील दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यात अध्यक्ष शरद पवार हे आमचे विठ्ठल आणि पांडुरग असल्याचं म्हणत त्यांना बडव्यांनी घेरलं असल्याचा आरोपही केला गेला. दरम्यान, यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वैदिक धर्मसभेने इशारा दिला आहे. शरद पवार यांना विठ्ठल, पांडुरंग संबोधल्यास आंदोलन करू असं वैदिक धर्मसभेने म्हटलं आहे. शरद पवार यांना विठ्ठल, पांडुरंग संबोधले तर आम्ही आंदोलन करू. शरद पवार यांना विठ्ठल म्हटल्यानं देवतांचा अपमान होतो. त्यामुुळे पवार यांना विठ्ठल, पांडुरंग म्हणणे तात्काळ थांबवा असं वैदिक धर्मसभेने म्हटलं आहे. शरद पवार यांचे आराध्य असलेले फुले, शाहू, आंबेडकर या नावाने त्यांना संबोधले तर आमची काही हरकत नाही असंही वैदिक धर्मसभेने म्हटलं. मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक; अजित पवार निघून गेल्यावर शिंदे-फडणवीस यांची चर्चा   दरम्यान, शरद पवार यांना बडव्यांनी घेरल्याच्या वक्तव्यावरही वैदिक धर्मसभेने आक्षेप घेतला आहे. बडव्यांचा उल्लेख करू नये. बडवे हे तेराशे वर्षे पुजारी होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख टीका करण्यासाठी करू नये अशी विनंती वैदिक धर्मसभेकडून कऱण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

वैदिक धर्मसभेने म्हटलं की, कोणत्याही राष्ट्रीय नेत्याला विठ्ठल, पांडुरंग संबोधू नये. शरद पवार यांनाही पांडुरंग म्हणू नये. जाणता राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांना असलेली एकमेवाद्वितीय अशी उपाधी आहे. तीसुद्धा कोणाला लावू नये. धर्मसभेने प्रामुख्याने अशी मागणी केलीय की शरद पवार यांना पांडुरंग संबोधू नये. विठ्ठल हे वैष्णवांचं आराध्य आहे. बडव्यांचा उल्लेखही करू नये. पांडुरंगाचे जे पुजारी 1200 वर्षे ज्यांनी पूजन केलं. हा परिवार पांडुरंगाच्या चरणी 13 शतकं पुजा करत आहे. त्यांना विठ्ठल मंदिरातून बाहेर काढण्यासाठी झालेलं राजकारण आम्हाला माहितीय. बडव्यांच्या नावाची ओरड सुरू आहे त्यातलं खरं किंवा खोटं हे आजचा विषय नाही. बडव्यांनी मुर्ती लपवून ठेवल्या म्हणून औरंगजेबाच्या तावडीतून त्या वाचल्या असंही धर्मसभेने म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या