JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik News : मल्लखांब शिका आणि फिट रहा! 106 वर्षांच्या परंपरेत घडतायत अनेक मल्ल, Video

Nashik News : मल्लखांब शिका आणि फिट रहा! 106 वर्षांच्या परंपरेत घडतायत अनेक मल्ल, Video

Nashik News: नाशिकमधील व्यायाम शाळेत 106 वर्षांपासून मल्लखांबाचं प्रशिक्षण दिलं जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 14 मार्च : पारंपारिक आणि आपल्या मातीतील खेळ अशी मल्लखांबची ओळख आहे. या खेळामुळे आपलं शरीर हे तंदुरुस्त राहतं, त्यामुळे मल्लखांबाला विशेष महत्त्व आहे.  मल्लखांबाची सुरुवात साधारण दोनशे वर्षांपूर्वी नाशिकच्या कोठुरे गावातील बाळभट्ट दादा देवधर यांनी सप्तशृंगी गडावर सुरुवात केली. नाशिक ही मल्लखांबाची जन्मभूमी आहे. नाशिकमध्ये सुरू झालेला ह खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचला आहे. अनेक मल्लांना प्रशिक्षण नाशिकची यशवंत व्यायाम शाळा ही जवळपास 106 वर्षे जुनी व्यायाम शाळा आहे. या व्यायाम शाळेत मल्लखांब कुस्ती तसेच खेळाचे विविध प्रकार शिकवले जातात. या ठिकाणी शहरातील जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी खेळण्यासाठी येत असतात. आतापर्यंत हजारो मुलांनी मल्लखांबाचे प्रशिक्षण घेतले आहे. अगदी वयाच्या सहाव्या वर्षापासून देखील मल्लखांब खेळला जातो त्यामुळे शरीर हे तंदुरुस्त आणि चांगलं राहतं. जास्तीत जास्त तरुणांनी मल्लखांब खेळला पाहिजे आतापर्यंत या व्यायाम शाळेने राष्ट्रीय स्तरावर खेळणारे अनेक खेळाडू तयार केले आहेत. अशी प्रतिक्रिया यशवंत व्यायाम शाळेचे प्रशिक्षक यशवंत जाधव यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास कसा होणार? 344 शाळांबाबत उघड झाली धक्कादायक माहिती मल्लखांब केल्यानंतर संपूर्ण शरीर हे पिळून निघतं आणि तंदुरुस्त बनते. आपल्या शरीराला कोणताही आजार जडत नाही. त्यामुळे मल्लखांब हा आपल्या साठी खूप महत्त्वाचा खेळ आहे. यशवंत व्यायाम शाळेत पहाटे चार वाजेपासूनच मल्लखांब खेळायला सुरुवात होते. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण या खेळामध्ये सहभागी होत असतात. विशेष म्हणजे आता मुली देखील या खेळाकडे वळू लागल्या आहेत. अनेक मुलींनी या खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलं आहे. नाशिकच्या मुलीनं करुन दाखवलं! अपयशानंतरही न खचता झाली उपजिल्हाधिकारी, Video कुठे करणार संपर्क? यशवंत व्यायाम शाळेमध्ये यशवंत जाधव सर हे गेल्या अनेक वर्षांपासून मुलांना शिकवण्याचं काम करत आहेत.आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मुल-मुली घडली आहेत.अनेक खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावर देखील खेळले आहेत. त्यांच्याकडून मल्लखांब शिकण्यासाठी  9890999894 या क्रमांकावर संपर्क करावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या