मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /MPSC Success Story : नाशिकच्या मुलीनं करुन दाखवलं! अपयशानंतरही न खचता झाली उपजिल्हाधिकारी, Video

MPSC Success Story : नाशिकच्या मुलीनं करुन दाखवलं! अपयशानंतरही न खचता झाली उपजिल्हाधिकारी, Video

X
MPSC

MPSC Result 2021 : तेजस्विनी आहेर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

MPSC Result 2021 : तेजस्विनी आहेर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Nashik, India

  विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी

  नाशिक, 13 मार्च : सध्याच्या तरुण वर्गाचा कल हा स्पर्धा परीक्षांकडे झुकलेला आहे. आज अनेक विद्यार्थी सरकारी नोकरी मिळावी यासाठी खुप मेहनत घेताना दिसतात. अशाच एका मेहनती तरुणीने अपयशानंतरही न खचता आपले सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात राहणाऱ्या तेजस्विनी आहेर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. सध्या तेजस्विनीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

  ...आणि शासकीय सेवेत जाण्याचे ठरवले

  तेजस्विनी ही मूळची नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील रहिवासी आहे. तीच प्राथमिक शिक्षण हे शारदा देवी ज्ञान विकास मंदिर येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण जिजा माता कन्या विद्यालय देवळा येथून पूर्ण केले. त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षणही देवळा येथेच केले. बारावीनंतर तेजस्विनीने पुण्यातील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून बी.ए मेकॅनिकलची डिग्री घेतली आणि त्यानंतर तिने शासकीय सेवेत जाण्याचे ठरवले.

  दररोज 8 ते 10 तास अभ्यास

  तेजस्विनीही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. बारावी पर्यंत चांगल्या मार्क्सनी पास झाल्यानंतर तिने राज्य सेवा परीक्षेत यश संपादन करायचं ठरवले. 'मी राज्य सेवा परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शन घेऊन अभ्यास सुरू केला. दररोज आठ ते दहा तास मी मन लावून अभ्यास करायची,या काळात कुटुंबांनी मोलाची साथ दिली आई वडिलांनी ठरवलं होत की मुलगी शिकून मोठी झाली पाहिजे. त्यामुळे मला ते सतत प्रेरणा द्यायचे आणि त्या दृष्टीने मी अभ्यास करत होते', असं तेजस्विनीने सांगितले.

  अवघ्या 7 गुणांनी अपयश आलं

  पुढे बोलताना तेजस्विनी सांगितले की, पहिल्या प्रयत्नात मला अवघ्या 7 गुणांनी अपयश आलं, तरी न खचता मी अभ्यासात सातत्य ठेवंल. यश येईल या विचाराने मी पुढे अभ्यास करत राहिले. 2021 ला दिलेल्या परीक्षेत अखेर मला यश मिळालं, मागासवर्ग संवर्गात राज्यात मुलींमध्ये दुसरी तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत मी 103 क्रमांकावर आहे. मला आता उपजिल्हाधिकारी पद मिळणार आहे आणि मी आता लोकांची सेवा करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे.

  MPSC Success Story: पूनमनं करून दाखवलं, छोट्या गावातून आली अन् उपजिल्हाधिकारी झाली! Video

  वाढत्या टेक्नॉलॉजीचा फायदा करून घ्या

  तेजस्विनीने विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीचा योग्य पद्धतीने वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तेजस्विनी म्हणाली की, सध्या माहिती मिळवण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म तयार आहेत. मात्र आपण त्या टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे, हल्ली अनेक मुलं त्या टेक्नॉलॉजीचा पाहिजे तसा उपयोग करत नाहीत. त्यामुळे त्यांना अपयश येत, मात्र आपण जर चांगला उपयोग करून घेतला तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकत. आपले आई-वडील खूप कष्ट उपसून आपल्याला शिक्षणासाठी पैसे देत असतात. त्याची जाण ठेवून आपण अभ्यास केला पाहिजे, त्यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळेल.

  MPSC Success Story: अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी झाली क्लास वन अधिकारी! Video

  माझी नात डेप्युटी कलेक्टर होणार

  तेजस्विनीने संपादन केलेल्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. विशेष करुन तेजस्विनीच्या कामगिरीने आजीचेही अभिमानाने उर भरुन आले आहे. तेजस्विनीची आजी म्हणते की, मनी नात डेप्युटी कलेक्टर व्हयनी , हाऊ आनंद मोठा शे, आमले तीना अभिमान वाटस. (माझी नात डेप्युटी कलेक्टर होणार आहे. मला याचा मोठा आनंद आहे. आम्हाला तिचा अभिमान वाटत आहे.)

  First published:

  Tags: Local18, MPSC Examination, Nashik, Success story