JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / साई पावला, शिर्डीमध्ये पहिल्यांदाच घडलं, विमानतळावर एकाच जल्लोष

साई पावला, शिर्डीमध्ये पहिल्यांदाच घडलं, विमानतळावर एकाच जल्लोष

देश विदेशातील साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात आता नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण

जाहिरात

आज शिर्डीच्या विमानतळावर पहिल्यांदाच रात्री विमान उतरले आहे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरिश दिमोटे, प्रतिनिधी शिर्डी, 09 एप्रिल : साई भक्तांच्या शिर्डीमधून खास बातमी आली आहे. आज पहिल्यांदाच शिर्डी विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान लँड झाले आहे. आजपासून नाईट लँडिंग सुविधा आजपासून सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रात्रीच्या लँडिंगची मागणी होत होती, अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे. आज शिर्डीच्या विमानतळावर पहिल्यांदाच रात्री विमान उतरले आहे दिल्लीहून निघालेल्या साईभक्तांना घेऊन इंडोगो कंपनीचे विमान शिर्डी विमानतळावर उतरले आहे. अल्पावधीतच शिर्डी विमानतळाने अनेक टप्पे गाठले असून आता नाईट लँडिंग सुविधाही आजपासून सुरू झाली आहे.

आज रात्री 8 वाजेच्या सुमारास 200 हून अधिक प्रवाशांना घेऊन दिल्ली येथून पहिलेच विमान शिर्डी विमानतळावर दाखल झालं. नाईट लँडिंग सुविधेमुळे साईभक्तांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला असून रात्रीच्या वेळी शिर्डी विमानतळावर पहिल्याच विमानाने येणाऱ्या प्रवाशांचा काकाडी गावाच्या ग्रामस्थांनी शाल देऊन सत्कार केला. (येथे मंदिरात देवाला 51 किलोची भाकरी केली जाते अर्पण, प्रसाद फक्त भाकरीचाच) देश विदेशातील साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात आता नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पहिल्यांदा रात्री विमानाने शिर्डीत उतरलेल्या दिल्लीहून आलेल्या साईभक्तांनी आनंद व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या