nashik cctv video
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवर भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणाऱ्या कारचा टायर फुटला आणि हा भयंकर अपघात झाला. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणाऱ्या कारचा टायर फुटला आणि गाडीवरचं नियंत्रण सुटलं. टायर फुटलेली चार चाकी पलटी होत दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या रस्त्यावर गेली आणि त्याने धडक दिली आहे.
दबक्या पावलांनी आला मालकाच्या उशाला झोपलेल्या कुत्र्याची शिकार करु गेला, पाहा VIDEOआवडते गाणे न वाजवल्याचा राग, बारमध्ये गोंधळ घालत कर्मचाऱ्याला मारहाण, CCTV फुटेज आलं समोर याच वेळी समोरून जाणाऱ्या दोन दुचाकींना समोरून धडक दिल्याने झाला अपघात. अपघाताची घटना समोर असलेल्या हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. CCTV मध्ये कैद झालेली घटना मन विचलित करणारी आहे. नामदेव विठ्ठल शेत आणि सुनील मनोहर महाले असं मृत व्यक्तींची नाव आहे.