भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक नाशिकमध्ये सुरू झाली आहे.
नाशिक, 11 फेब्रुवारी : पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक व राज्यात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये दोन दिवसांपासून भाजपचं मंथन सुरू आहे. मागील काळात काय रणनीती असावी, यावर खलबत सुरू आहे. आजच्या या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचा राज्यात 200 चा नारा असणार आहे. भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरू झाली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी विचारमंथन करताना दिसतील. (राष्ट्रवादीचे आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात! अश्लील व्हिडीओ बनवून मागितली खंडणी) आजच्या या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचा राज्यात 200 चा नारा असणार आहे. लोकसभेसाठी मिशन 45 तर विधानसभेसाठी मिशन 200 असा नारा आजच्या कार्यकारणीत बैठकीत देणार आहे. या कार्यकारिणी बैठकीत लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. शुक्रवारी या बैठकीत लोकसभा प्रवास, स्वावलंबी भारत, मन की बात, एक भारत श्रेष्ठ भारत, फ्रेंड्स ऑफ बिजेपी, धन्यवाद मोदीजी, मतदार नोंदणी, डेटा व्यवस्थापन, युवा वॉरीयर्स, सोशल मीडिया आणि त्याचा वापर व विधानसभा प्रवास या विषयांचा आढावा घेण्यात आला. (‘प्रणितीताई माझ्या मोठ्या भगिनी..’ रोहित पवार यांचा अखेर प्रकरणावर पडदा; कार्यकर्त्यांना दिला सल्ला) तर आज दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर विस्तृत चर्चा होणार आहे. आज बडे नेते मार्गदर्शन करतील. यावेळी राजकीय आणि कृषी क्षेत्रासह विविध विषयांवर ठराव पारित होतील. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भाजप मंत्री आणि हजाराहून अधिक पदाधिकारी या बैठकीस उपस्थित असणार आहे. विशेष म्हणजे, पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सुनावणी होणार आहे. तसंच निवडणूक आयोगातही पक्षाच्या चिन्हावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या कार्यकारिणी बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.