लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 28 मार्च : नाशिक (Nashik) जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना गंगापूर धरणाला लागून असलेल्या एका फार्म हाऊसवर सुरू असलेली हुक्का पार्टी (hookah party) पोलिसांनी उधळून लावली. जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांनी स्वत: मध्यरात्री 2 वाजता केलेल्या या कारवाईत शहरातील हाय प्रोफाइल घरातील तरुण-तरुणींना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना नाशिकच्या गंगापूर धरणालगत असलेल्या एका खाजगी फार्म हाऊसवर शहरातील काही श्रीमंत घरातील मुलांची हाय-फ्रॉफाईल हुक्का पार्टी सुरू होती. जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वत: या खाजगी फार्म हाऊसवर छापा टाकत ही पार्टी उधळून लावली. या पार्टीत एका मोठ्या डान्स हॉलमध्ये बिअर, वाईन आणि व्हिस्कीचे पेग रिचवत, हुक्याचे झुररें सोडत डान्स करत होते. निर्बंध नसल्यास 1 महिन्यात 1 कोरोना रुग्ण 406 जणांना बाधित करतो, केंद्राचा इशारा मात्र, पोलिसांना बघताच या धनदांडग्याच्या मुलांची पळापळ झाली. नाशिक शहरच नव्हे तर मुंबई पुण्यातीलही हायप्रोफाईल घरातील तरुण-तरुणी या हुक्का पार्टीत सहभागी झाले होते. शनिवार रविवार विकेंडला अशा पार्ट्याचं आयोजन होत असल्याची पोलिसांना खबर होती. पोलिसांच्या कारवाईत प्रोफाइल घरातील तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कोरोनामुळे जिल्ह्यात अनेक निर्बंध घालून दिले असताना शहराला लागून असलेल्या एका खाजगी फार्म हाऊसवर सुरू असलेल्या हुक्का पार्टीवर पोलिसांनी कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईत ‘बडे बाप की औलाद’ म्हणून मिरवणाऱ्या मुलांच्या महागड्या गाड्या देखील पोलिसांनी जप्त केल्या आहे. या पार्टीत नाचगाने,दारू आणि हुक्क्या सोबत ड्रग्जचा देखील वापर झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑफर;31 मार्चपर्यंत FD केल्यास होईल मोठा फायदा मध्यरात्री दोन वाजता खाजगी फार्म हाऊसवर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी स्वत: टाकलेल्या छाप्यात मुबंई पुण्यासह नाशिकमधील हाय फ्रोफाईल घरातील तरुण तरुणींसह 30 ते 40 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांनी स्वत: ही कारवाई केल्याने या कारवाईनंतर सुरू झालेला राजकीय हस्तक्षेपही मवाळ झाला. मात्र, आता या परिसरात असे अनेक फार्म हाऊस असून तिथेही अशा पार्ट्या होत असल्याच बोललं जातंय. त्यामुळे आता पोलिसांच्या या कारवाईने या सर्वच फार्म हाऊसच्या मालकांना मोठा धक्का बसलाय हे मात्र नक्की.