• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • या बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल ऑफर; 31 मार्चपर्यंत FD केल्यास होईल मोठा फायदा

या बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल ऑफर; 31 मार्चपर्यंत FD केल्यास होईल मोठा फायदा

ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ठ कालावधी असलेल्या एफडीवर (Fixed Deposite) चालू व्याजदरावर 0.50 टक्के जादा व्याजदर दिला जात होता. म्हणजेच नेहमीच्या ग्राहकांना मिळत असलेल्या व्याजाच्या तुलनेत 1 टक्के ज्यादा व्याज होतं.

  • Share this:
नवी दिल्ली, 28 मार्च : गेल्या वर्षी मे 2020 मध्ये कोरोना (Corona) काळात एसबीआय (SBI), एचडीएफसी (HDFC), आयसीआयसीआय (ICICI) आणि बॅंक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) या बॅंकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizens) विशेष योजना आणली होती. या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ठ कालावधी असलेल्या एफडीवर (Fixed Deposit) चालू व्याजदरावर 0.50 टक्के जादा व्याजदर दिला जात होता. म्हणजेच नेहमीच्या ग्राहकांना मिळत असलेल्या व्याजाच्या तुलनेत 1 टक्के ज्यादा व्याज होतं. या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मार्च अखेरपर्यंत संधी उपलब्ध आहे. एसबीआयने वाढवला कालवधी - देशातील सर्वात मोठी बॅंक एसबीआयने (SBI) या योजनेसाठीचा कालावधी 30 जून 2021 पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक या योजनेचा येत्या तीन महिन्यात लाभ घेऊ शकतील. सध्या एसबीआयमध्ये सामान्य नागरिकांना 5 वर्षांसाठी 5.4 टक्के व्याज दिलं जातं. जर एखाद्या जेष्ठ नागरिकाने या विशेष योजनेतंर्गत एफडी केली, तर त्यांना 6.20 टक्के व्याजदर लागू होईल. ही योजना 5 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांच्या कालावधीच्या एफडीसाठी लागू आहे.

(वाचा - रतन टाटांशी पंगा घेणं पडलं महागात; आता 22000 कोटींचं कर्ज कसं फेडणार?)

एचडीएफसी बॅंक - एचडीएफसीने सिनिअर सिटीझन केअर योजना (Senior Citizens Care Scheme) आणली आहे. बॅंक या योजनेतंर्गत डिपॉझिटसवर 0.75 टक्के अधिक व्याज देते. जर एखाद्या जेष्ठ नागरिकाने एचडीएफसी सिनिअर सिटीझन केअर एफडी योजनतंर्गत काही रक्कम फिक्स डिपॉझिट केली, तर त्यास 6.25 टक्के व्याज दर लागू आहे. बॅंक ऑफ बडोदा - बॅंक ऑफ बडोदाच्या विशेष एफडी योजनेतंर्गत (5 ते 10 वर्षांसाठी) ज्येष्ठ नागरिकाने रक्कम फिक्स डिपॉझिट केली, तर त्या एफडीवर 6.25 टक्के व्याज दर लागू आहे.

(वाचा - SBI, ICICI, HDFC बँकेत खातं असणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'ही' सेवा लवकरच होणार बंद!)

आयसीआयसीआय बॅंक - आयसीआयसीआय बॅंकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयसीआयसीआय बॅंक गोल्डन इयर्स (ICICI Bank Golden Years) ही विशेष एफडी योजना आणली आहे. बॅंक या योजनेतंर्गत 0.80 टक्के अधिक व्याज देत आहे. या योजनेतंर्गत बॅंकेकडून जेष्ठ नागरिकांना वर्षाला 6.30 टक्के व्याज दर दिला जात आहे.
First published: