JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpur News: नागपूरकरांनो पाणी जपून वापरा, उद्या 'या' भागात शट डाऊन!

Nagpur News: नागपूरकरांनो पाणी जपून वापरा, उद्या 'या' भागात शट डाऊन!

नागपुरातील बहुतांश भागात उद्या, बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 25 एप्रिल :  नागपूरकरांना बुधवारी (26 एप्रिल) पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. महापारेषणने 33 केव्ही फीडरच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील जवळपास  34 जलकुंभावरून पाणीपुरवठा खंडित होईल. शहरातील बहुतांश भागात पाणी येणार नसल्याने नागपूरकरांना पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. कुठे होणार परिणाम? नवेगाव खैरी पम्पिंग स्टेशनवरून नागपूर शहरातील गोरेवाडा भागातल्या पेंच-1, पेंच 2, पेंच-3  जलशुद्धीकरण केंद्र आणि गोरेवाडा तलाव या भागाला तसंच पेंच-4 जलशुद्धीकरण केंद्राला कच्च्या पाण्याचा पुरवठा केला जातो.  त्यामुळे या 3 तासांमध्ये गोरेवाडा भागातले पेंच 1 ते 3 जलशुद्धीकरण केंद्र आणि गोधणी भागातील पेंच 4 जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे बंद असेल. त्यामुळे शहरातील जवळपास 34 जलकुंभांवर या काळात परिणाम होईल.

14 तासांचे शट डाऊन उत्तर नागपुरातील क्षेत्रात पाणीपुरवठा बळकटीकरण करण्यासाठी नागपूर महापालिकेने पुढाकार घेतला आहे. अमृत योजने अंतर्गत सुगत नगर येथे नवीन जलकुंभ निर्माण केले आहे. या नवीन जलकुंभाला पेंच-4 जलशुद्धीकरण केंद्रच्या मुख्य जलवाहिनीला जोडण्यासाठी गोधनी पेंच-4 प्रकल्पाचे 14 तासांचे शट डाऊन करण्यात आले आहे. मुख्य जलवाहिनीला पेंच-4 जलशुद्धीकरण केंद्र 800 मिमी व्यासाच्या जलवाहिनीद्वारे जोडण्यात येणार आहे. या कामादरम्यान नागपूर महानगरपालिकेचे गोधनी पेंच-4 जलशुद्धीकरण केंद्र संपूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे आशी नगर झोन, लक्ष्मी नगर झोन, धरमपेठ झोन, हनुमान नगर झोन व नेहरू नगर झोन्समधील 14 जलकुंभांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बाधित होणार आहे. 3 तास शट डाऊन बाधित 34 जलकुंभ पेंच 1 जलशुद्धीकरण केंद्र : - धरमपेठ झोन ( गव्हर्नर हाऊस -सीताबर्डी जलकुंभ), धंतोली झोन (वंजारी नगर -1 जलकुंभ, वंजारी नगर-2 जलकुंभ, रेशीमबाग जलकुंभ , आणि हनुमान नगर जलकुंभ), गांधीबाग झोन (गव्हर्नर हाऊस -मेडिकल कॉलेज) सतरंजीपूरा झोन ( गव्हर्नर हाऊस -बोरियापुरा आणि सेंट्रल रेल्वे ) मंगळवारी झोन ( गोरेवाडा जलकुंभ, गव्हर्नर हाऊस -राजनगर जलकुंभ आणि गव्हर्नर हाऊस -सदर) पेंच 2 जलशुद्धीकरण केंद्र : - लक्ष्मी नगर झोन (लक्ष्मी नगर जुने जलकुंभ, गायत्री नगर जलकुंभ, त्रिमूर्ती नगर जलकुंभ, प्रताप नगर जलकुंभ, खामला जलकुंभ, जयताला जलकुंभ , टाकली सिम जलकुंभ), धरमपेठ झोन (राम नगर-1 जलकुंभ, राम नगर -2 जलकुंभ, सेमिनरी हिल्स -1 जलकुंभ, सेमिनरी हिल्स -2 जलकुंभ, दाभा जलकुंभ, टेकडी वाडी जलकुंभ, रायफल लाईन, फुटाळा लाईन, सिविल लाईन्स, आयबीएम लाईन) हनुमान नगर झोन (चिंच भवन जलकुंभ), गांधीबाग झोन ( सीताबर्डी-किल्ला 1 जलकुंभ, सीताबर्डी-किल्ला-2 जलकुंभ, किल्ला महाल जलकुंभ आणि बोरियापुरा जलकुंभ), मंगळवारी झोन (गिट्टीखदान जलकुंभ) Weather Forecast : विदर्भासाठी पुढचे 4 दिवस धोक्याचे! हवामान खात्यानं दिला गंभीर इशारा, Photos शटडाऊनमुळे बाधित 16 जलकुंभ नारा जलकुंभ, नारी/ जरीपटका जलकुंभ (आशी नगर झोन), धंतोली जलकुंभ (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर 1 आणि 2 जलकुंभ, म्हाळगी नगर जलकुंभ (हनुमान नगर झोन), सक्करदरा -1, सक्करदरा-2, सक्करदरा -3 जलकुंभ (नेहरू नगर झोन), हुडकेश्वर आणि नरसाळा, बोकारा आणि गोधनी रेल्वे पाणी जपून वापरण्याचे आवाहन शहरातील शट डाऊन कालावधी दरम्यान आणि नंतर देखील बाधित भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. या भागातील सर्व नागरिकांनी वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे. अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिकेच्या मदत क्रमांक 1800-266-9899 वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात, असे आवाहन नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या